शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते डहाणूतील शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 00:25 IST

कृषी विभागामार्फत फळबाग लागवड योजनेतून चिकू, आंबा या झाडांची लागवड केली. तसेच १० सफेद जामची कलमे लावली. त्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला. या फळबागेत आंतरपीक म्हणून फुलशेती व भाजीपाला लागवडीतून नफा मिळवला.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : डहाणू तालुक्यातील आगर गावातील चंद्रकांत रामचंद्र पाटील हे ४६ वर्षांचे शेतकरी उच्चशिक्षित आहेत. एका खाजगी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करताना, त्यांनी सेंद्रिय पद्धतीची शेती सुरू केली. त्यांची पत्नी कीर्तिका या ‘ग्रामीण विकास’ या विषयात पदवीधर असल्याने, त्यांच्या कृषी शिक्षणाचा फायदा होतो. या कुटुंबाने १० वर्षांपूर्वी दोन एकर शेतजमीन खरेदी केली.कृषी विभागामार्फत फळबाग लागवड योजनेतून चिकू, आंबा या झाडांची लागवड केली. तसेच १० सफेद जामची कलमे लावली. त्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला. या फळबागेत आंतरपीक म्हणून फुलशेती व भाजीपाला लागवडीतून नफा मिळवला.शिवाय गांडूळखत, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, कंपोस्ट खत, जीवामृत, दशपर्णी अर्क इत्यादी शेतीपूरक व्यवसायांची जोड दिली. त्यांच्याकडे गीर जातीच्या गायी असून त्यांचे शेण आणि शेतातील गवत व कचऱ्यापासून गांडूळखत तयार केले जाते. कृषी विभागामार्फत २०१६ साली सेंद्रिय शेतीच्या गटशेती योजनेेतून २९ शेतकऱ्यांचा ‘संजीवनी सेंद्रिय शेती गट’ स्थापन झाला. या गटाच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्र सरकारच्या आत्माअंतर्गत संजीवनी सेंद्रिय कृषी उत्पादन गटात खजिनदार या पदावर नियुक्ती झाली.कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र कोसबाडमार्फत प्रशिक्षणातून सेंद्रिय शेतीची माहिती त्यांना झाली. त्याद्वारे विविध प्रकारच्या निविष्ठा तयार करण्यास शिकून सेंद्रिय शेती आणि गांडूळखताचे उत्पादन प्रथम सुरू करायचे ठरवले.कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातून ईसेनिया फेटिडा या जातीची गांडूळ बीजे आणली. त्यांच्याकडे गांडूळखतासाठी जुन्या पद्धतीच्या दोन सिमेंट टाक्या, नवीन पद्धतीने गांडूळखत बनविण्यासाठी चार गांडूळ बॅगा असून इतर गांडूळखत फळझाडांच्या सावलीत तयार केले जाते. शेणखत आणि शेतातील गवत कचरा एकत्र केले जाते. हे सर्व झाडांच्या सावलीत सिमेंटच्या टाकीत टाकून त्यावर पाणी शिंपडून एक महिना ठेवले जाते. त्यामुळे हे मिश्रण अर्धवट कुजते. नंतर हे गांडूळखतासाठी बनवलेल्या टाकीत किंवा बॅगमध्ये टाकून त्यावर दोन ते तीन किलो गांडूळ सोडतात. त्यावर रोज पाणी शिंपडल्याने ओलावा मिळून गांडुळांची संख्या भरपूर वाढून एक ते दीड महिन्यात गांडूळखत तयार होत असल्याचे पाटील सांगतात. खत काढण्यापूर्वी पाणी शिंपडणे थांबवून वरच्या थरातील खत हलक्या हाताने काढले जाते. महिन्याकाठी ७ ते ८ टन या खताचे उत्पादन घेतले जाते. या खताचा उपयोग शेतीसाठी होतोच शिवाय विक्रीतून आर्थिक फायदाही होतो.अर्धा एकर क्षेत्रामध्ये भाजीपाला लागवड केली जाते. यामध्ये प्रामुख्याने मिरची, टोमॅटो, वांगी आणि वाल ही पिके घेतली जातात. या भाजीपाल्यावर संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने कीड रोग नियंत्रण केले जाते. त्यासाठी विविध सापळे, दशपर्णी अर्काची फवारणी केली जाते. जमिनीतीतून जीवामृत आणि गांडूळ पाणी दिले जाते. हा सर्व भाजीपाला स्थानिक बाजारात विकला जातो. भाजीपाल्यासोबत झेंडू व चवळी लागवडही केली जाते. त्यांनी तीन गीर जातीच्या गायी व २० देशी कोंबड्या पाळल्या आहेत. गोमूत्र जीवामृत बनविण्यासाठी वापरले जाते. अंडी व दूध विक्री केली जाते.किडींचे अशाप्रकारे केले जाते नियंत्रणभाजीपाला पिकामध्ये रस शोषक किडी येत असतात. त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी ३० याप्रमाणे लावतात. हिरव्या आळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे एकरात ५ ते ६ लावले जातात. तसेच १० ते १२ ओळींनंतर एक ओळ झेंडूची लावली जाते. ही फुले नियमित तोडली जातात. त्यामुळे भाजीपाल्यामध्ये हिरव्या अळीची अंडी आणि अळी अवस्था फुलांसोबत शेतातून बाहेर जाऊन किडीच्या प्रादुर्भाव रोखता येतो.