शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

नगरपरिषद निवडणुकीची उत्सुकता

By admin | Updated: November 10, 2016 03:34 IST

मुरुड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामागचे कारणही तसेच आहे. राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक फुटून त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

नांदगाव/ मुरुड : मुरुड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामागचे कारणही तसेच आहे. राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक फुटून त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. तर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या स्नेहा किशोर पाटील या नगराध्यक्षा म्हणून विराजमान झाल्यावर त्यांनी सुद्धा आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेची ताकद शहरात वाढली आहे. त्यामुळे आघाडी केलेल्या राष्ट्रवादी, शेकाप व काँग्रेस आय पक्ष कशी लढत होते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.मुरुड नगरपरिषदेच्या या निवडणुकीत ४९८४ महिला तर ५२१८ पुरु ष मतदान करणार आहेत. एकंदर शहरातील १० हजार २०२ मतदाते मतदान करणार आहेत. प्रभाग क्र मांक १ मध्ये भोगेश्वर आळी, खांजादा यांचे निवासस्थान, उजव्या बाजूने भगत पॅरॅडाईस इमारतीपर्यंत, दत्त मंदिर परिसर,एसटी आगार परिसर,शेगवाडा नाका आदी भूभाग येत असून येथे हा प्रभाग १ (अ) हा इमाव महिलांसाठी राखीव तर १ (ब) हा खुला प्रवर्ग आहे. या प्रभागात ५७५ महिला तर ५७० पुरु ष मतदाते आहेत. प्रभाग क्र मांक २ मध्ये दत्त मंदिर रस्ता ते उजव्या बाजूने माजी आमदार डी.एन.चौलकर यांच्या निवास्थानापर्यंत कुंभारवाडा ते माजी उपनगराध्यक्ष अतिक खतीब यांच्या निवासस्थानापर्यंत व भोगेश्वर आळीतील काही भाग समाविष्ट होत आहे. प्रभाग २(अ) हा महिलांसाठी खुला प्रवर्ग म्हणून आहे. तर २(ब) हा खुला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे. येथे ६४२ महिला तर ६६३ पुरु ष मतदान करणार आहेत. प्रभाग ३ मध्ये नाभिक समाजमंदिर परिसर, मिठागर नाका, जुनी पेठ परिसरातील विठ्ठल मंदिर परिसर, व कुंभारवाड्यातील काही भागाचा समावेश होत आहे. प्रभाग ३ (अ) हा इमाव सर्वसाधारणसाठी आरक्षित असून ३ (ब) हा महिलांसाठी खुला प्रवर्ग म्हणून आरक्षित आहे. या प्रभागात ६३९ महिला तर ६६८ पुरु ष मतदान करणार आहेत. प्रभाग ४ मध्ये लक्ष्मीखार परिसर, नगरपरिषद खाजण जमीन परिसर, हिंदू स्मशानभूमी परिसर, गावदेवी पाखाडी, दस्तुरी नाका आदी भूभाग येत आहेत. प्रभाग ४ मध्ये ८६६ महिला तर ७२७ पुरु ष मतदान करणार आहेत. प्रभाग ५ मध्ये मिलबार नाका, पंडित नेहरू मार्ग, रणदिवे आळी, मसाल गल्ली, दक्षिण बाजूकडील खाजण भाग येथे ६१० महिला तर ६४० पुरु ष मतदाते आहेत. प्रभाग ६ मध्ये कोटेश्वरी मंदिर, पोलीस वसाहत, शेखांनी इमारत, लोकमान्य टिळक रस्ता, येथे ५०९ महिला तर ५४१ पुरु ष मतदाते आहेत. प्रभाग ७ मध्ये समुद्रकिनारा ते जलाल पांगारकर यांचे घर, सर एस हायस्कूलमागील बाजूने कोळीवाडा परिसर ते मासळी मार्केट हद्द येथे ५०३ महिला तर ५५० पुरु ष मतदाते आहेत. प्रभाग ८ मध्ये बाजारपेठ,व्यापारी बँक परिसर, मुस्लीम कब्रस्थान, कस्टम कार्यालय परिसर येथे ८२० महिला तर ८५९ पुरु ष मतदाते आहेत.