शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

विकासाची गंगोत्री सरपंचाच्या हाती

By admin | Updated: April 16, 2016 01:15 IST

केंद्रीय व राज्याच्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ग्रामीण विकासाच्या संदर्भात महत्त्वाची अन् लक्षात ठेवण्याजोगी बाब आहे, ती म्हणजे ग्रामपंचायती व नगरपालिकांना एक वर्षात २.८७ कोटी रुपयांचे

- दत्ता म्हात्रे,  पेण

केंद्रीय व राज्याच्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ग्रामीण विकासाच्या संदर्भात महत्त्वाची अन् लक्षात ठेवण्याजोगी बाब आहे, ती म्हणजे ग्रामपंचायती व नगरपालिकांना एक वर्षात २.८७ कोटी रुपयांचे वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार हस्तांतरणाप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीस वार्षिक ८७ लाख रुपयांचे थेट अनुदान मिळणार आहे. याची प्रत्यक्षरीत्या सुरुवात १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०२० या कालखंडात केंद्र शासनाकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्याला बेसिक व परफार्मन्स ग्रँडच्या स्वरूपात अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा निधी थेट ग्रामपंचायत स्तरावर वितरीत करण्यात आला असून रायगड जिल्ह्यातील ८२३ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकासासाठी राजिपमार्फत तब्बल ४१ कोटी रुपयांचे थेट वितरण झाले आहे. राज्यात गावांच्या विकासाची गंगोत्री आता थेट सरपंचाच्या हातात आल्याने आगामी कालखंडात ग्रामपंचायतीच्या निवडणुकात जबरदस्त चुरस पहावयास मिळेल.केंद्रातील मोदी सरकारच्या नव्या धोरणांच्या नीतीनुसार, ग्रामपंचायती अर्थात पंचायत राज बळकटीकरणाचा नवा फंडा सरपंच महोदयांना चांगलाच फायद्याचा ठरणार आहे. भविष्यातील मिनी मंत्रालये म्हणून ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण व थेट निधीची पूर्तता याद्वारे पाच वर्षाच्या सरपंचपदाच्या कालावधीत तब्बल ४ कोटी ३५ लाखांचा एकूण निधी उपलब्ध होणार आहे. शहराप्रमाणे खेड्यांना आधुनिक लूक मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाने पुढे सरसावत नमनालाच घडाभर पाणी या नात्याने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत स्तरावरच्या लोकप्रतिनिधींना गावाचा विकास आराखडा तयार करण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. त्यानुसार पैशाअभावी विकासकामांची ओरड थांबावी म्हणूनच बेसिक व परफार्मन्स ग्रँडमधून माझं गाव माझी ग्रामपंचायत ही भावना प्रामाणिक हेतूने साध्य व्हावी यासाठी १४ व्या वित्त आयोगाचा थेट निधी वितरीत करून ग्रामविकासाची गुरुकिल्ली सरपंचाच्या हाती दिली आहे. यातून गतिमान प्रशासन व शासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे टेबलावरून न हलणाऱ्या फाईलींचे रडगाणे कायम बंद होणार आहे. केंद्र व राज्याच्या विकास निधीचे पाठबळ मिळणार असल्याने खेडी स्वयंपूर्ण होण्याचा मार्गही या निमित्ताने खुला होणार आहे.ग्रामपंचायतींना थेट वितरीत झालेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या उपलब्ध निधीनुसार ग्रामपंचायतीच्या कक्षेत येणाऱ्या गावांमध्ये कोणकोणती विकासकामे करण्याची रुपरेषायाची साधकबाधकचर्चा करून सरपंच आणि ग्रामसेवकांना मासिक मिटिंग व ग्रामसभेत संमत करून घ्यावयाची आहेत. वर्षाकाठी मिळणारा ८७ लाखांचा विकास निधी गावचा प्रथम नागरिक म्हणून सरपंचाचा अधिकार मोठा असणार आहे. समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजनाग्रामीण भागातील गावगाड्यात भेडसावणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करता येणार आहेत. त्यानुसार प्राधान्याने पाणीपुरवठा स्रोतांची कामे, पाणी शुद्धीकरण प्रकल्प, रेन हार्वेस्टिंग इ. कामांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. पाणीटंचाई समस्या कायमस्वरूपी निराकरणकरण्यासाठी या विकास निधीचा पुरपूर उपयोग व्हावा असे शासनाचे मत आहे. गावाच्या गरजेनुसार कामाची यादी तालुकास्तरीय समिती छाननी करेल. या समितीमध्ये पंचायत समिती गटविकास अधिकारी, बांधकाम इंजिनिअर, पाणीपुरवठा इंजिनिअर, बालविकास प्रकल्प अधिकारी यांचा समावेश आहे. ही समिती तांत्रिक मुद्यांची छाननी करून शिफारशींसह अंतिम मंजुरीसाठी ग्रामसभेत पाठवेल. ग्रामसभेने गावाच्या विकासकामांना मंजुरी दिल्यानंतर त्यामध्ये काही बदल करावयाचा असेल तर तो अंतिम अधिकार मुख्याधिकारी यांना देण्यात आला आहे. रोडे गाव हे दुर्गम डोंगराळ भागात मोडत असून कें द्र व राज्य शासनाचा थेट निधी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मिळाला. यामुळे गावाच्या विकासकामांसाठी निधीची हमी मिळाली आहे, याचा आनंद आहे. यामुळे विकासकामे लवकर होणार आहेत.- स्वप्निल म्हात्रे, सरपंच, रोडेशासनाने पंचायत राज व्यवस्थेला बळकटी मिळावी या हेतूने ग्रामपंचायत स्थरावर निधी उपलब्ध करु न दिला. ग्रामसभेत ग्रामस्थांना विकासकामांच्या आखणीवर किती खर्च होणार याची माहिती मिळणार असून ग्रामपंचायतीची गणसंख्याही वाढेल अशी अपेक्षा आहे.- डी.के . पाटील, ग्रामसेवक, जोहे