शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

किनारपट्टी प्रदूषणामुळे मत्स्यव्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 00:13 IST

आर्थिक लाभासाठी केल्या जात असलेल्या बेसुमार मासेमारीमुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या माशांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर

अलिबाग : रायगड जिल्ह्याचा २४० कि.मी.चा विस्तीर्ण सागरी किनारा मासेमारीसाठी अनुकूल असला तरी मागील काही वर्षात या किनारपट्टीवर प्रदूषण वाढले आहे. आर्थिक लाभासाठी केल्या जात असलेल्या बेसुमार मासेमारीमुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या माशांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना आता मत्स्य दुष्काळाची चिंता वाटू लागली आहे.जिल्ह्यातील खाडीकिनाऱ्यावर कोळी समाजाचा मासेमारी हाच प्रमुख व्यवसाय आहे. या खाडीत मिळणारे बोंबील, ढोमी, मांदेली, घोळ, कलेंट, कोलंबी, शिंगाली, चिंबोरी, खुबे, कालवे, निवट्या इत्यादी माशांचे प्रकार हे कोळी बांधवाना दैनंदिन रोजीरोटी मिळवून देतात. त्यामुळे तेथील कोळी बांधवानी माशांची निर्यातही सुरू केली आहे. खाडीपट्ट्यांतून व किनाऱ्यावरून मिळालेली मासळी देशांतील सर्व राज्यात पाठविली जात आहे. जलप्रदूषणामुळे या व्यवसायावर फार मोठे संकट आले आहे. मध्यंतरी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन या संस्थेने मुंबई व किनारपट्टीच्या परिसरात मत्स्यव्यवसायावर संशोधन केले. या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई रायगडच्या सागरी व खाडी परिसरातील १२५ माशांच्या जाती होत्या. त्यापैकी आता फक्त ७८ जाती शिल्लक आहेत. १० ते १५ वर्षांच्या काळांत येथे अतिरिक्त मासेमारी झाली. शिवाय मासेमारीसाठी पर्शियन जाळ्यांचा वापर तसेच एलइडी पद्धतीने मासेमारी करण्यात आली. यामुळे मासेमारी मोठ्या प्रमाणात झाली. माजगाव, मुरुड, नांदगाव, एकदा, राजापुरी, दिघी, तुरुंबबाडी, आदगाव, भरडखोल, बोर्ली, कोरली ही सर्व गावे दिघी पोर्टमुळे बाधित होणार आहेत. तर समुद्रकिनाऱ्यावरील खाडीलगतचा परिसर येथील मासे कमी झाल्याने येथील कोळी समाजावर उपासमारीचे सावट पसरले आहे. मासेविक्रीसाठी अपुऱ्या सोयीसुविधा, डिझेल परतावा, होड्या बांधणी व दुरुस्तीसाठी आवश्यक जागा नसणे, मासळी सुकविण्यासाठी जागा नसणे, कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था नसणे, महिलांना मासेविक्रीसाठी अपुरी व्यवस्था असणे यातच तिसरी मुंबई घोषित केल्याने या भागात येणारे नवे प्रकल्प व येणारे कोस्टल रोड, बेसुमार खारफुटीची कत्तल यामुळे या क्षेत्रातील भागातून नाहीशा होणाऱ्या माशांच्या जाती याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.