शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

बंदीमुळे २५० कोटींची उलाढाल ठप्प

By admin | Updated: November 30, 2015 02:23 IST

चार महिन्यांपासून नाखवा आणि खलाशी यांच्यातील यांत्रिक बुमच्या (पावर ब्लॉक) वादात ससून डॉक बंदरातील जवळपास सत्तर टक्के पर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे.

मधुकर ठाकूर ,  उरणचार महिन्यांपासून नाखवा आणि खलाशी यांच्यातील यांत्रिक बुमच्या (पावर ब्लॉक) वादात ससून डॉक बंदरातील जवळपास सत्तर टक्के पर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे मच्छीमार व्यावसायिक आणि या व्यवसायावर आधारित असलेल्या लाखो कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. नाखवा आणि खलाशीवर्गातील वादामुळे चार महिन्यांत सुमारे अडीचशे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. दोघांतील वादावर वेळीच तोडगा न निघाल्यास मच्छीमार व्यवसाय आर्थिक संकटात सापडण्याची भीती मच्छीमार व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.मागील २५ वर्षांपासून पर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय सुरू आहे. पारंपरिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या हजारो मच्छीमारांवर सध्या मासेमारी व्यवसायच बंद ठेवण्याची पाळी आली आहे. याचे कारण नाखवा आणि खलाशी यांच्यातील वाद होय. या आधी पर्ससीन नेट मासेमारी करण्यासाठी मच्छीमार बोटींवर १८ खलाशी काम करीत असत. या पध्दतीमध्ये समुद्राच्या भूभागावर मासळी दिसली की वर्तुळात जाळी टाकून बांगडा, सुरमई, हलवा, टुना, शिंगाला आदी जातीची मासळी पकडली जाते. पर्ससीन नेट मासेमारीसाठी एकदा टाकलेली जाळी खेचण्यासाठी १८ खलाशांना तीन तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे दिवसातून दोन ते तीन वेळाच मासेमारी करणे शक्य होते. यावर उपाय म्हणून गेल्या वर्षी काही मच्छीमार नाखवा मंडळीने मच्छीमार बोटींवर बुम बसवून मासेमारी व्यवसायाला सुरुवात केली होती. यांत्रिक बुममुळे मच्छीमारांचा आर्थिक फायदाच होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. कारण दिवसातून दोन ते तीन वेळाच मासेमारी करणे शक्य होत असताना बुममुळे दिवसातून ८ ते १० वेळा मासेमारी करणे शक्य होऊ लागले. मासेही विपुल मिळू लागले.यांत्रिक बुममुळे खलाशांचीही मेहनत कमी झाली. त्यामुळे मच्छीमार व्यावसायिकांनी यांत्रिक बुमलाच अधिक पसंती दिली आहे.यांत्रिक बुमच्या अतिवापरामुळे मासळी उत्पत्तीवरही मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होऊ लागला. तसेच मासळी आवक वाढताच मासळीचे भावही घसरण्यास सुरुवात झाली. शिवाय जाळींचेही अधिक नुकसान होऊ लागले. बुमच्या अतिवापरामुळे आर्थिक नुकसानीच्याही बाजू समोर आल्या. त्यामुळे मच्छीमार व्यावसायिकांनी मच्छीमार बोटींवर बुम न बसविताच मासेमारी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे खलाशीवर्ग दुखावला गेला आणि त्यांनी असहकाराची भूमिका घेतली.