शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

अलिबागमध्ये आदिवासींची शेतीमाल व्यवसायात भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 05:24 IST

कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील आदिवासी बांधव अनेक वर्षांपासून उपेक्षित राहिलेला होता. मात्र अलीकडे काबाडकष्ट करून मजुरी मिळवत आपल्या कुटुंबाचा ...

कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील आदिवासी बांधव अनेक वर्षांपासून उपेक्षित राहिलेला होता. मात्र अलीकडे काबाडकष्ट करून मजुरी मिळवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे हे चित्र आता बदलत आहे. त्यांनी शेतीमालाच्या व्यवसायात उडी घेऊन समाजातील आपले स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.तरुण पिढीचा शिक्षणाकडील कल आणि इतर समाजाबरोबर आणण्याचा शासनाचा कल या सर्व गोष्टींमुळे अतिगरीब म्हणून ओळखला जाणारा आदिवासी आता बदलताना दिसतो. तालुक्यातील वाघोली आदिवासी वाडीवरील अनिल पवार या तरुणाने आतापर्यंत पोट भरण्यासाठी अनेक कष्ट केले. परंतु आता बाजारात उतरून शेतमालाला योग्य मोबदला मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

शेतात भाजी, फळांचे पीक घेऊनरस्त्याच्या कडेला किंवा बाजारात कपडा टाकून विकणे आणि त्याचा भाव ठरविण्याचा अधिकार ग्राहकास असणे हे कुठेतरी पवार यांना पटत नव्हते. म्हणून त्यांनी ठरविले की, शेतीमधील माल शेतकऱ्यांकडून खरेदी करून तो माल बाजारात विक्री करणे. परंतु यासाठी आर्थिक निधी पाहिजे, असल्याने त्यांनी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) या शासकीय योजनेशी संपर्क साधला. त्यानुसार हाशिवरे, वाघोली, नारंगी, चिंचवली या आदिवासीवाडीवरील बांधवांशी भेटून त्याचे महत्त्व पटवून त्यांना एकत्र आणले. जमलेल्या ५०० सदस्यांकडून प्रत्येकी रु. एक हजार मात्र शेअर्स जमा केले. त्याचबरोबर शासकीय अनुदान मिळाले. अशाने डॉ. हार्मन आदिवासी फार्म्स प्रोड्युसर कंपनी, पळी येथे स्थापन केली. या कंपनीचे आदिवासी बंधू-भगिनी संचालक निवडले.सुरुवातीला कांदा, बटाटा, लसूण, फळे इत्यादी माल शेतकºयांकडून खरेदी करून तो माल बाजारभावापेक्षा कमी दराने विकणे असा उद्देश ठेवून ही संस्था कामाला लागली.

व्यवहारामध्ये दलाली नसल्याने शेतकºयांचा माल थेट ग्राहकाला विकून फायदा होत आहे.च्मॉल, बाजार समिती, उच्चभ्रू शीतगृह दुकाने यामधून विक्री केलेला माल कमी दरात खरेदी करून अवाढव्य किमती आकारून तोच माल ग्राहकाला विकणे ही शेतकºयांची होणारी पिळवणूक थांबेल. शासकीय मदतीने शेतकरी कंपन्या स्थापन करून आपल्यातच मालाची देवाणघेवाण करून शेतीमाल विकणे यामुळे स्थानिक शेतकºयांना फायदा होणार आहे. या कंपनीमुळे येथील शेतकºयांना आपल्या शेतमालासाठी एक व्यासपीठ मिळाले आहे आणि सेंद्रिय व उच्च प्रतीचा ताजा स्वच्छ भाजीपाला व फळे या कंपनीतून ग्राहकांना मिळणार आहेत.कारली, पडवळ विदेशातच्तालुक्यातील दुधी, कारली व पडवळ अशा प्रकारची भाजी कुवेत देशात कंपनीमार्फत निर्यात केली आहे. तिथून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आर्थिक अडचण भासत असल्यामुळे व्यवसाय वाढविण्यावर अडचण येत आहे. परंतु व्यवसायवृद्धी कशी होईल, या दृष्टीने प्रयत्नात आहोत, असे अध्यक्ष पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :RaigadरायगडMumbaiमुंबई