शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
5
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
6
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
7
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
8
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
9
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
10
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
11
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
12
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
13
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
14
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
15
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
16
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
17
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
18
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
19
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
20
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी

९८० शिक्षकांचे पगार रखडले

By admin | Updated: April 10, 2016 01:12 IST

एकीकडे सरळ डेटा, शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोध, त्याचबरोबर विद्यार्थी पटसंख्या वाढवणे तसेच विविध शाळाबाह्य कामांत व्यस्त असणारे शिक्षक गेल्या दोन महिन्यांपासून पगारापासून

- वैभव गायकर,  पनवेलएकीकडे सरळ डेटा, शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोध, त्याचबरोबर विद्यार्थी पटसंख्या वाढवणे तसेच विविध शाळाबाह्य कामांत व्यस्त असणारे शिक्षक गेल्या दोन महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत. पनवेल तालुक्यातील ९८० शिक्षकांची कुटुंबे आर्थिक विवंचनेत सापडली आहेत. शिक्षण विभागाकडून काम, दर्जा, त्याचबरोबर विविध गोष्टींची अपेक्षा केली जात असताना शिक्षकांना वेतन वेळेवर का दिले जात नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत आयकर भरण्याचे कारण देऊन लेखा विभाग वेळ मारून नेत आहे. सध्या इंग्रजी माध्यमाची चलती आहे. त्यामुळे मराठी शाळांची पटसंख्या घसरत चालली आहे. विद्यार्थ्यांचा पट कायम ठेवण्यासाठी शिक्षकांनाच मोठी कसरत करावी लागते. वाडे पाडे, झोपडपट्टी, त्याचबरोबर गावागावात फिरून विद्यार्थी जमा करण्याचे काम गुरूंनाच करावे लागते. शासनाने घसरत चाललेल्या पटसंख्येला अप्रत्यक्षरीत्या शिक्षकांनाच जबाबदार धरले आहे. या कारणाने शिक्षण विभागाने सरळ डेटा, पायाभूत चाचण्या, ज्ञानरचनावाद यासारख्या अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या सगळ्या गोष्टींची जबाबदारी शिक्षकांवरच दिली आहे. याशिवाय जनगणना, निवडणुका यासारखी विविध शाळाबाह्य कामांना शिक्षकांना जुंपण्यात येते. असे असतानाही शिक्षकांना वेळेवर वेतन दिले जात नसल्याची ओरड होत आहे. पनवेल तालुक्यात रायगड जिल्हा परिषद, त्याचबरोबर अनुदानित खासगी शिक्षण संस्थेत ९८० शिक्षक काम करतात. या शिक्षकांचे वेतन आॅनलाइन पद्धतीने देण्यात येत आहे. या पध्दतीमुळे वेतन वेळेत जमा होईल, असे बोलले जात होते. मात्र रायगड जिल्ह्यातील आणि पर्यायाने पनवेल तालुक्यामधील शिक्षकांना वेळेवर वेतन मिळत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. कधी कधी महिन्याच्या शेवटी पगार मिळत असल्याचे अनेकांनी सांगितले. त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे वेतन पनवेल तालुक्यातील शिक्षकांना मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे. वास्तविक पाहता या कालावधीत अनेकांच्या घरात लग्नकार्य असते. त्याचबरोबर पाल्यांचे पुढील वर्षाचे शुल्क भरावयाचे असते. घराचे हप्ते, पाणी व वीजबिलाचा भरणाही करावयाचा असतो. मात्र दोन महिने वेतन न मिळाल्याने अनेकांचे हप्ते रखडले आहेत. त्याचबरोबर वीज आणि पाणी बिल सुद्धा भरणा करता आलेले नाही. कित्येकांना मुलांच्या फीसाठी उसनवारी करावी लागत आहे. एकंदरीतच हक्काचे वेतन न मिळाल्याने गुरु जींना इतरांकडे हात पसरावे लागत आहेत. शिक्षण विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. घर, त्याचबरोबर इतर खरेदीकरिता शिक्षक इतर नोकरदारांप्रमाणे बँकांकडून कर्ज घेतात. त्याकरिता १६ नंबरचा फॉर्म आवश्यक असतो. तो फॉर्म शिक्षण विभागाकडून शिक्षकांना उशिरा दिला जातो. याशिवाय नॉन क्रिमिलियर दाखला काढण्यासाठी या फॉर्मची गरज असते. मात्र तो उशिरा मिळत असल्याने शिक्षकांच्या पाल्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.शिक्षण विभागाने सरळ डेटा, पायाभूत चाचण्या, ज्ञानरचनावाद यासारख्या अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या सगळ्या गोष्टींची जबाबदारी शिक्षकांवरच दिली आहे. एप्रिल महिन्यात सर्वजणांचे आयकर विवरण पत्र व आवश्यक दस्तऐवज संकलन केले जाते. या प्रक्रि येत पडताळणीमुळे काहीसा विलंब होतो. त्यामुळे शिक्षकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडल्याची वस्तुस्थिती आहे. याबाबत लवकरात लवकर तांत्रिक बाबींची पूर्तता करून शिक्षकांना वेतन दिले जाईल.शेषराव बढेजिल्हा शिक्षण अधिकारी, रायगड