शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

७० टक्के युवक पब्जीच्या आहारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 06:51 IST

लाखो रुपयांच्या बक्षिसांचे आमिष दाखविले जात आहे. त्यामधून ही पिढी मानसिकदृष्ट्या अकार्यक्षम होत चालली असून, ७० टक्के युवावर्ग पब्जी या खेळाच्या आहारी गेला आहे.

निखिल म्हात्रेअलिबाग : सध्या पब्जी या खेळाने यंगीस्थानात रान माजविलेले आहे. त्यामुळे पब्जी या खेळाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत प्रयत्न सुरू असताना, या खेळाच्या आॅनलाइन स्पर्धांना उधाण आले आहे. लाखो रुपयांच्या बक्षिसांचे आमिष दाखविले जात आहे. त्यामधून ही पिढी मानसिकदृष्ट्या अकार्यक्षम होत चालली असून, ७० टक्के युवावर्ग पब्जी या खेळाच्या आहारी गेला आहे.सध्याच्या युवावर्गाचा आवडता गेम म्हणजे प्लेयर्स अननोन बॅटलग्राउंड अर्थात पब्जी हा आॅनलाइन खेळ, पालक आणि शिक्षकांसाठी चिंतेची बाब ठरला आहे. या खेळामुळे तरुणांमध्ये नैराश्य आणि मानसिक ताण वाढत असल्याचे त्यातून दिसून येत आहे. रोज रात्री १० ते २ या वेळेत अनेक यूट्युब वाहिन्यांवर हिंदी आणि मराठीत पब्जीच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येते. दररोज साधारण ४० ते ५० हजार तरुण थेट प्रक्षेपण पाहतात. वाहिन्यांवर समालोचन करणारे तरुण हे नवे पब्जी स्टार म्हणून उदयास येत आहेत. त्यांना संकेतस्थळांच्या माध्यमातून २० रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम टीप देतात.पब्जी खेळाचा अतिवापर केल्यास तरुणांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन नैराश्य येऊ शकते. पालकांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. अत्यावश्यक असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल भुसारे यांनी सांगितले. अभ्यास आणि सर्व दैनंदिन कामे संपवून नंतरच पब्जी गेम खेळावा. मैदानी खेळ हे मोबाइल खेळांपेक्षा महत्त्वाचे आहेत. जसा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो, तसेच पब्जीबाबतही होते, असे मी सातत्याने माझ्या फेसबुक पेजवर सांगत असतो. मात्र, ते आपण कितपत मनावर घ्यायचे, हे स्वत: ठरविले पाहिजे.>वेळीच मुलांना बाहेर काढणे गरजेचे - मानसोपचार तज्ज्ञस्पर्धेसाठी आॅनलाइन वॉररूम तयार करण्यात येते. स्पर्धा तीन ते चार तास चालते. शेवटी आॅनलाइन जिवंत राहणाऱ्या स्पर्धकाला पाच हजारांपासून ते एक कोटी रु पयांपर्यंत बक्षीस मिळते, असे सोशल मीडियावर सांगण्यात येते. तर मोठ्या पब्जी स्पर्धा जागतिक पातळीवर खेळल्या जातात. सर्वाधिक गुण मिळविणाºयाला थेट पब्जी फोरमतर्फे जागतिक पातळीवरच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते. समूहानेही सहभाग घेता येतो. त्यामुळे आॅनलाइन साखळीत आताची मुले अडकून पडली आहेत. त्यांना योग्य वेळीच यातून बाहेर काढणे अत्यावश्यक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ अमोल भुसारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.