शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

उपचार कसले? पाहुणचारच! पुण्याच्या ससून रुग्णालयात ड्रग माफियांची अनेक महिने बडदास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 05:29 IST

ललित पाटील गेल्या जून महिन्यापासून ससूनमध्ये अल्सर, टीबी आणि हार्निया उपचारासाठी मुक्काम ठाेकून आहे.

पुणे : ससून रुग्णालयाच्या गेटवरून २ काेटी १४ लाखांचे मेफेड्राॅन जप्त केल्यानंतर या अंमली पदार्थांच्या तस्करीचा सूत्रधार ललित पाटील ससूनमध्ये महिनाेनमहिने उपचार घेत असल्याचे समाेर आले आहे. याआधीदेखील फेक एन्काउंटरमध्ये अटकेत असलेल्या प्रदीप शर्मानेही ससूनमध्ये असाच पाहुणचार झाेडला होता. तुरुंगात जे करता येत नाही ते ससूनमध्ये उपचारांच्या नावाखाली करता येते, असा समज यामुळे होत असून, ससूनमधील वरिष्ठ अधिकारी आणि ड्रग माफिया यांची मिलिभगत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, ससूनचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

ललित पाटील गेल्या जून महिन्यापासून ससूनमध्ये अल्सर, टीबी आणि हार्निया उपचारासाठी मुक्काम ठाेकून आहे. अल्सरचा उपचार आठवड्याभरात हाेऊ शकताे. इतकेच नव्हे, तर कितीही माेठी शस्त्रक्रिया असली, तरी जास्तीत जास्त महिनाभरात पेशंट बरा हाेताे. मात्र ललित पाटील  एवढ्या महिन्यांपासून कुणाच्या आशीर्वादाने ससूनमध्ये होता, असा प्रश्न विचारला जात असून याबाबतची चाैकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

तोंड उघडाल तर खबरदार : अधीष्ठात्यांचा दम

ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी ससूनमधील सर्व डॉक्टर, कर्मचारी यांनी या प्रकरणाबाबत कोणालाही काहीही माहिती देऊ नका, अशी धमकीच दिली आहे. त्यामुळे येथे कोणी काहीच बोलत नाही. तसेच, या प्रकरणाबाबत डॉ. ठाकूर यांना फोनवरून संपर्क केला असता त्यांनीदेखील प्रतिसाद दिला नाही.

अधिष्ठात्यांच्या युनिटमध्ये उपचार?

ललित पाटील याच्यावर सध्या अल्सरसाठी उपचार सुरू असून, ते उपचार खुद्द ससूनचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांच्याच युनिटमध्ये सुरू असल्याची माहिती ससूनमधील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे.

आधी टीबी आता अल्सर

ललित पाटील हा दर वेळी वेगवेगळी कारणे सांगून ससूनमध्ये दाखल झाला आहे. याआधी ताे जिन्यातून पडला म्हणून, नंतर टीबी झाला, हर्निया आणि आता अल्सरच्या उपचारासाठी तब्बल चार महिन्यांपासून उपचार घेत असल्याचे समोर आले आहे.

कैदी वॉर्डचे सीसीटीव्ही बंद

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ३० सप्टेंबर रोजी ससून रुग्णालयासमोर २ कोटी १४ लाख ३० हजार रुपये किमतीचे मॅफेड्रोन जप्त केल्या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील रुग्णालयातील ज्या कैदी वॉर्डमध्ये उपचार घेत आहे, तेथील सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बंद असल्याचे समोर आले आहे. तसेच, ललितकडे दोन महागडे आणि नवे फोन आढळले असून ते त्याच्यापर्यंत कसे पोहोचले, याचा शोध पोलिस घेत आहेत.

ललित पाटीलवर अजूनही उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्याला ससूनमधून डिस्चार्ज दिल्यावर तो पुन्हा येरवडा कारागृहात जाईल. त्यानंतर पुणे पोलिस चाकणप्रकरणी खेड न्यायालयाला या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला ताब्यात घेण्याची विनंती करतील.

- सुनील थोपटे,

वरिष्ठ पोलिस निरीक्षक

ललित पाटील याच्या नाशिकमधील घरी गुन्हे शाखेचे पथक गेले असता, त्याच्या घरचे सदस्य आधीच पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या जवळच्या सगळ्यांचे मोबाइलही बंद आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सुभाष जानकी मंडल (२९, रा. देहूरोड, मूळ रा. झारखंड) आणि रऊफ रहीम शेख (१९, रा. ताडीवाला रोड) या दोघांना अटक केली

या प्रकरणाबाबत प्राथमिक अहवाल मी ससूनच्या अधिष्ठात्यांकडून मागवला आहे. तसेच, या प्रकरणाची चाैकशी समितीद्वारे केली जाईल.

- डाॅ. दिलीप म्हैसेकर,

संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशाेधन विभाग, मुंबई

टॅग्स :hospitalहॉस्पिटल