शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

आमच्या वाट्याला आलंय पशूंच जिणं

By admin | Updated: May 23, 2016 01:49 IST

घराला चारही बाजूंनी पत्रे, हवा येण्यास जागा नाही. बाहेर तळपते ऊन, पत्र्याच्या घरात असह्य होणारा उकाडा अशा स्थितीत घराबाहेर थांबून दिवस काढता येतो.

पिंपरी : घराला चारही बाजूंनी पत्रे, हवा येण्यास जागा नाही. बाहेर तळपते ऊन, पत्र्याच्या घरात असह्य होणारा उकाडा अशा स्थितीत घराबाहेर थांबून दिवस काढता येतो. परंतु, तापलेल्या पत्र्याखाली रात्री घरात थांबणे कठीण होते. नदीकाठचा परिसर असल्याने डासांचा उपद्रव सहन करावा लागतो. वीज नसल्याने डासांच्या त्रासापासून मुक्ततेसाठी केले जाणारे उपाय तोकडे पडतात. ‘आम्हीसुद्धा माणसं आहोत’ हे टाहो फोडून सांगण्याची वेळ आता पिंपरी, मिलिंदनगर येथील पत्राशेडच्या रहिवाशांवर आली आहे. परिसरात एक बालक फाटक्या साडीने तयार केलेल्या झोक्यात झोके घेत होते. झोके कसले, घरात गुदमरते म्हणून ते मोकळ्या हवेत आले होते. सिंधू काळे ही वृद्ध महिला घराच्या दारात बसली होती. अगोदरच आजारी, त्यात खुराड्यात राहिल्यासारखे पत्र्याच्या घरात कोंडून आजारपण वाढू शकते. यामुळे घराच्या दारात बसल्याचे कारण त्या महिलने सांगितले. त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या कविता साबळे यांनीही अशीच व्यथा मांडली. चांगल्या इमारतीत राहणाऱ्यांना कुलर, पंखा वापरून उन्हाळ्याचा त्रास कमी करता येतो. परंतु, येथे वीजच नसल्याने उपकरणांचा वापर करता येत नाही. पत्राशेडमधील अन्य रहिवाशांना महापालिकेच्या पुनर्वसन प्रकल्पातील घरांमध्ये स्थलांतरित केले. आता केवळ ५० कुटुंबे उरली आहेत. त्यांच्या वाट्याला अत्यंत वाईट जीवन आले आहे. नदीकाठचा हा परिसर एकीकडे उकाड्याचा त्रास, तर दुसरीकडे डासांचा उपद्रव एकेक दिवस शिक्षा भोगल्याचा अनुभव येथील रहिवाशांना येत आहे, असे शकुंतला चव्हाण या महिलेने नमूद केले. (प्रतिनिधी)दिशाभूल, गैरसमजमिलिंदनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना काही पुढाऱ्यांनी दोन घरे देण्याचे आश्वासन दिले होते. वास्तविक पाहता महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जे पात्र ठरले, त्यांनाच पुनर्वसन प्रकल्पातील घरांचे वितरण करण्यात आले आहे. परंतु, येथील रहिवाशांमध्ये पुढाऱ्यांच्या आश्वासनांमुळे गैरसमज पसरला आहे. आपणास दोन घरे मिळू शकतील ही आशा बाळगून रहिवाशी मिलिंदनगरची जागा सोडत नाहीत. ज्यांनी आश्वासन दिले, त्यांनी रहिवाशांची दिशाभूल केली आहे. त्यांच्यात गैरसमज पसरवला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशी आज ना उद्या आपल्याला न्याय मिळेल, आता थोड्याच संख्येने कुटुंब पत्राशेडमध्ये राहत आहेत. त्यामुळे या कमी संख्येने राहणाऱ्या कुटुंबांना दोन घरे देण्यास महापालिकेला अडचण येणार नाही, अशी त्यांनी मनाची समजूत करून घेतली आहे. त्यामुळे हाल अपेष्टा सहन करून ते जीवन कंठीत आहेत.पत्राशेडमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना गतवर्षी आॅगस्टमध्येच पुनर्वसन प्रकल्पातील घरांचा ताबा देण्याची तयारी महापालिकेने केली. लाभार्थींचा स्वहिस्सा भरून त्यांनी ताबा घ्यावा, अशा सूचना दिल्या. ज्यांना ५० हजारांपर्यंतच्या रकमेचा स्वहिस्सा रक्कम भरण्यास अडचणी आहेत, त्यांना कर्ज स्वरूपात ही रक्कम उपलब्ध करून देण्यास महापालिका तयार आहे. खुल्या वर्गातील रहिवाशांसाठी ५१ हजार, तर मागासवर्गीयांसाठी ४२ हजार रुपये स्वहिस्सा रक्कम निश्चित केली आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. जागा सोडण्याची त्यांची मानसिकता नाही. त्यामुळे हालअपेष्टा सहन करत ते त्या ठिकाणी राहत आहेत.- मिनीनाथ दंडवतेसहायक आयुक्त, झोपडपट्टी पुनर्वसन विभाग