पुणो : शहरात पाणीकपात लागू केल्यानंतर पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी महापालिकेकडून स्थापन करण्यात आलेल्या गस्ती पथकांनी गेल्या आठवडाभरात तब्बल 15क् जणांवर कारवाई केली आहे. महापालिकेने घोषणा केलेली ही पथके अद्यापही कागदावरच असल्याची बाब ‘लोकमत’ने मागील आठवडय़ात ‘पाण्याचा गैरवापर रोखणारी पथके कागदावरच’ या मथळ्याखालील वृत्ताद्वारे समोर आणली होती. त्याची गंभीर दखल घेऊन महापालिकेने तत्काळ ही पथके स्थापन केली होती.
या पथकासाठीच्या कर्मचा:यांची अद्याप नेमणूक झालेली नसून, त्यांना अद्याप कोणतेही आदेश अथवा काम देण्यात आलेले नाही. यामुळे हे पथक अद्याप कार्यान्वित झालेली नव्हती. ही बाब ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर तत्काळ पथके स्थापून 5 जुलैपासून कारवाई सुरू करण्यात आली.
या पथकांनी मागील सहा दिवसांत अनावश्यक पाणीवापर सुरू असलेल्या 22 ठिकाणी कारवाई केली. 131 अनधिकृत नळजोड तोडले, वाहने धुणा:या 23 जणांवरही कारवाई केली. याशिवाय, पाणी खेचण्यासाठी लावलेल्या 52 मोटीरी जप्त केल्या, 114 ठिकाणची गळती रोखली, तसेच 8 ठिकाणी खासगी स्रोतांमधून टँकरद्वारे विकल्या जाणा:या पाणीपुरवठय़ावर टाच आणली असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.(प्रतिनिधी)