शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

दोन प्रभागांमध्ये भाजपाच्या पॅनेलची सरशी

By admin | Updated: February 24, 2017 03:33 IST

कसबा, विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या तिन्ही प्रभागांपैकी शनिवार-सदाशिव पेठ (प्रभाग क्रमांक १५)मध्ये

पुणे : कसबा, विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या तिन्ही प्रभागांपैकी शनिवार-सदाशिव पेठ (प्रभाग क्रमांक १५)मध्ये आणि पर्वती-नवी पेठ (प्रभाग २९)मध्ये भाजपाच्या उमेदवारांनी विजयश्री संपादन केली. रास्ता पेठ-रविवार पेठ (प्रभाग १७)मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि भाजपा व शिवसेनेचा प्रत्येकी १उमेदवार निवडून आला.सुरुवातीपासूनच्या सर्व फेऱ्यांमध्ये भाजपाच्या उमेदवारांनी आघाडी कायम राखून प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. प्रभाग क्रमांक १५मध्ये गट अ मध्ये हेमंत रासने यांनी निकटचे प्रतिस्पर्धी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेश भोकरे यांचा १७,७६४ मतांनी पराभव केला. रासने यांना २५,९२९ मते मिळाली. शिवसेनेचे निरंजन दाभेकर यांना ४,७५६ मतांवर समाधान मानावे लागले. तर, र्कांग्रेसचे सुरेश चव्हाण यांना ३,४०९मते मिळाली. या प्रभागात १,५४६ मतदारांना कोणताही उमेदवार पसंत नव्हता.गट ब मध्ये गायत्री खडके यांनी नजीकच्या प्रतिस्पर्धी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यमान नगरसेवक रूपाली पाटील-ठोंबरे यांचा ११,४९६ मतांनी पराभव केला. खडके यांना २६,२६२ तर पाटील यांना १४,७६६ मते मिळाली. २,७७१ मतदारांनी या गटामध्ये नोटाचा वापर केला.क गटामध्ये मुक्ता टिळक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या पोकळे यांचा २२,९८८ मतांनी दणदणीत पराभव केला. शिवसेनेच्या प्रतिभा भिलारे यांना ४,५२१, मनसेच्या मनीषा कावेडिया यांना ४,२३५ मते मिळाली. १,७६८ जणांनी नोटाचा अवलंब केला. गट ड मध्ये राजेश येनपुरे यांनी निकटचे प्रतिस्पर्धी मनसेचे आशिष देवधर यांचा १५,६७१ मतांनी पराभव केला. येनपुरे यांना २३,२६०, देवधर यांना ७,५८९, शिवसेनेचे मयूर कडू यांना ५,७६९ आणि अपक्ष अंजली सोलापुरे यांना ४१२ मते मिळाली. १,६८७ जणांनी नोटाचे बटण दाबले.रास्ता पेठ-रविवार पेठ (प्रभाग १७)मध्ये अ गटात राष्ट्रवादीच्या लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनी भाजपाच्या रोहिणी नाईक यांचा ५,५१२ मतांनी पराभव केला. आंदेकर यांना १६,००५, नाईक यांना १०,४९३, शिवसेनेच्या सोनम मयूर झेंडे यांना ८,१२१ व राष्ट्रवादीच्या शीला आटपाळकर यांना ५,४८१ मते मिळाली. ब गटात सुलोचना तेजेंद्र कोंढरे यांनी निकटच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या कोमल राजेश बारगुजे यांचा १,८२९ मतांनी पराभव केला. कोंढरे यांना ११,१८१, बारगुजे यांना ९,३५२, राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनश्री विलास गायकवाड यांना ७,९५१, काँग्रेसच्या पूनम प्रशांत भिलारे यांना ६,९२५, एमआयएमच्या रेहाना युसूफ शेख यांना २,१२८ मते मिळाली. अन्य ४ अपक्ष उमेदवारांना किरकोळ मते होती.गट क मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वनराज आंदेकर यांनी भाजपाचे उमेश ऊर्फ अण्णा चव्हाण यांचा ३,४६४ मतांनी पराभव केला. आंदेकर यांना १३,५६७, चव्हाण यांना १०,१०३ मते मिळाली. काँग्रेसचे वीरेंद्र किराड यांना ७,२९३ मतांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे विजय मारटकर यांना ७,०८१ मते मिळाली. एमआयएमच्या शाहीद जावेद शेख यांना १,५८२, मनसेचे आनंद आगरवाल यांना ८७२, बसपाच्या सुरेखा गोल्डन बढाई यांना २५५मते मिळाली.३ प्रभागांमध्ये भाजपा-शिवसेना लढत पर्वती-नवी पेठ (प्रभाग २९)मध्ये भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले. या ३ प्रभागांमध्ये भाजपा-शिवसेना अशी लढत झाली. भाजपाच्या नवोदित सरस्वती शेंडगे निवडून आल्या. विद्यमान नगरसेवक स्मिता विनोद वस्ते यांना पुन्हा संधी मिळाली. महेश लडकत, भाजयुमोचे धीरज घाटे यांनाही मतदारांनी निवडून दिले. वस्ते यांना ११,११५, घाटे यांना ९,८९०, लडकत यांना ५,५८४ आणि शेंडगे यांना १,९३२ मतांची आघाडी मिळाली. अ गटातून सरस्वती शेंडगे यांना १४,०७३ तर नजीकच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या जयश्री जाधव यांना १२,१४१ मते मिळाली. या गटात राष्ट्रवादीच्या रिना शिंदे यांना ५,१५३ मते मिळाली. रिपब्लिकन पक्षाच्या सत्यभामा हणमंत साठे यांना केवळ ६८६, काँग्रेसच्या माधुरी पाटोळे यांना ३,३२७ मते मिळाली. ब गटातून लडकत यांनी शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक अशोक हरणावळ यांना पराभूत केले. राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक विनायक हणमघर यांनाही पराभवाचा धक्का बसला. या गटात लडकत यांना १४,४९१, हरणावळ यांना ८,९०७ मते मिळाली. हणमघर यांना ७,८७६ तर काँग्रेसचे किरण गायकवाड यांना २,५१७ मते मिळाली़क गटातून स्मिता वस्ते यांनी शिवसेनेच्या प्रज्ञा काकडे यांना पराभूत केले. वस्ते यांना १७,२५६, काकडे यांना ६,१४१, राष्ट्रवादीच्या योगिता मेमाणे यांना ५,४५१ मते मिळाली. मनसेच्या उषा काळे यांना ३,४२४ मते मिळाली. अपक्ष शारदा गावडे यांना १,८४४ मते मिळाली.ड गटातून घाटे यांनी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष सुधीर काळे यांचा पराभव केला. घाटे यांना १५,३८९ मते मिळाली. काळे यांना ५,४९९ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे श्याम मानकर यांनाही पराभव स्वीकारावा लागला. त्यांना ५,३८१ मते मिळाली. मनसेच्या अक्षता लांडगे यांना ३,१७८ मते मिळाली. निकाल जाहीर करण्यास मोठा विलंबनिवडणूक आयोगाच्या परवानगीने निकाल जाहीर केले जातील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आरती भोसले यांनी दिली होती. सर्व्हर डाऊन असल्याने निवडणूक आयोगापर्यंत माहिती पोहोचण्यास विलंब लागून निकाल जाहीर करण्यासही मोठा विलंब झाला. रात्री उशिरापर्यंत पर्वती-नवी पेठ प्रभागाचा निकालाचा अहवाल निवडणूक आयोगापर्यंत न पोहोचल्याने तो जाहीर करण्यास मोठा विलंब झाला. त्यामुळे ज्या प्रभागांच्या फेऱ्यांचे वाचन केले जात होते, ते कार्यकर्ते प्रत्यक्षात आपापल्या प्रभागात जल्लोष करीत होते. बाहेर शुकशुकाट होता.दुपारनंतर जल्लोषटिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मतमोजणी झाली. निकाल ऐकण्यासाठी विविध पक्षांचे कार्यकर्ते सकाळपासून थांबलेले होते. दुपारनंतर जल्लोष सुरू झाला.