शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

पाणीबचतीसाठी करू प्रयत्न..!

By admin | Updated: September 2, 2015 04:29 IST

पुणे जिल्ह्यात यंदाच्या वर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धरणांमध्ये निम्माही पाणीसाठा नाही. येत्या काही दिवसांत पाणीकपात लागू होणार आहे

पुणे : पुणे जिल्ह्यात यंदाच्या वर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धरणांमध्ये निम्माही पाणीसाठा नाही. येत्या काही दिवसांत पाणीकपात लागू होणार आहे. पाणीबचतीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत आहेत. नागरिकांनीही प्रशासनाच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देऊन पाणीबचतीच्या मोहिमेत सहभागी व्हायला हवे. यासाठी अगदी छोट्या- छोट्या गोष्टी केल्या तरी या मोहिमेत आपलाही वाटा उचलू शकता. पाण्याची बचत ही पुढील काळासाठीची बेगमी ठरू शकते़ पाण्याची बचत करण्यासाठी आपल्याला काही सवयी बदलण्याची आवश्यकता आहे़ जुन्या सवयी मोडण्याची गरज आहे़ पाण्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी सर्वांनी जाणून घेणे गरजेचे आहे...----------इतके पाणी वाचवू शकता...आंघोळीसाठी बादली वापरल्यास ४० लिटर पाणी लागते, पण शॉवर किंवा शॉवर पॅनेल वापरल्यास ८० लिटर पाणी लागू शकते, तर या ठिकाणी आपण ४० लिटर पाणी वाचवू शकतो.बाहेरून घरात आल्यावर चेहरा, हात-पाय धुण्यासाठी बादली व मगचा वापर केल्यास तीन लिटर पाणी लागू शकते़ पण तेच काम नळ चालू ठेवून केल्यास सात लिटर पाणी लागू शकते व चेहरा धुताना जर का साबण डोळ्यात गेला तर दहा लिटरपेक्षा जास्त पाणी वापरले जाऊ शकते. इथे आपण सात लिटर पाणी वाचवू शकू.आजकाल बऱ्याच घरात कपडे धुण्यासाठी- वॉशिंग मशीन वापरली जाते. घरातील सर्वांचे कपडे मिळून जर का एकदाच मशीन लावले तर २०० लिटर पाणी लागते. पण हेच काम दोन-तीन वेळेस केल्यास ५०० लिटरपेक्षा जास्त पाणी वापरले जाते. या ठिकाणी ३०० लिटर पाणी सहज वाचू शकते.जेवणाची भांडी धुण्यासाठी ३० लिटर पाणी पुरेसे आहे. अनेकदा काम करणाऱ्या महिला नळ मोठा चालू ठेवून भांडी धुतल्यास बरेचसे पाणी वाया जात असते. त्याऐवजी नळ गरजेपुरता सुरु ठेवल्यास बरेच पाणी वाचविता येईल़ स्वयंपाकासाठी १५ लिटर पाणी भरपूर झाले, पण त्यासाठी लागणारे तांदूळ, डाळ, भाज्या इ. चार-पाच पाण्यातून धुऊन घेतल्या जातात व ‘आम्ही किती स्वच्छ राहतो’ हे सांगण्याच्या नादात हे सर्व केले जाते. अशा ठिकाणी पाण्याबरोबर जीवनसत्त्वेसुद्धा वाहून जातात व ४० लिटपर्यंत पाणी वापरले जाऊ शकते.दात घासण्याच्या वेळी, दाढी करताना वॉश बेसिनचा नळ चालू राहिल्यास बरेचसे पाणी वाहून जात असते. एक-दोन लिटरमध्ये होणाऱ्या कामासाठी १०-१२ लिटर पाणी लागते. त्याऐवजी मगमध्ये पाणी घेऊन दात घासल्यास पाणी वाचवू शकतो़टॉयलेटमधील फ्लश टँक किंवा फ्लश व्हॉल्स, इथे पाण्याची सर्वात जास्त नासाडी होत असते. एका वेळेस १५-२० लिटर पाणी जात असते. पण हेच काम तीन-पाच लिटरमध्ये सहज होऊ शकते. फ्लश टँकची क्षमता कमी केल्यास काही लिटर पाणी आपण सहज वाचवू शकतो.घरातून बाहेर जाताना सर्व नळ बंद आहेत किंवा नाही ते जरूर पाहणे. एखादा जरी नळ चालू राहिल्यास सर्वच पाणी वाहून जात असते.घरातील नळांचे वॉशर्स, सप्लेनडर्स न बदलल्यास एक-दोन थेंब रात्रभर पडत राहिल्यास १०-१२ लिटर पाणी वाया जाऊ शकते. म्हणून नळांची दुरुस्ती वेळेवर केली पाहिजे.२४ तास अखंड पाणीपुरवठा ही संकल्पना चुकीची आहे. आपले फ्लॅट खपविण्यासाठी बिल्डरांनी ही योजना आखली, पण त्यासाठी त्यांनी धरण, तलाव, डॅम, टाक्या कुठे बांधल्यात असं कधी ऐकिवात नाही. --------------पाण्याची किंमत नसल्याने खरी पाण्याची नासाडी होत असते. पण २०० लिटरचे पिंप भरून ठेवल्यास व गरजेनुसार वापर केल्यास पाण्याची बरीच बचत होऊ शकते.इमारतीतील जिने धुण्यासाठी, गाड्या धुण्यासाठी बाग-बगीचे यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. बऱ्याच ठिकाणी बोअरवेल केलेली नसते. पण पाण्याची खरी बचत करायची असल्यास त्यासाठी सांडपाण्याचे शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे.घराच्या बाहेर पडल्यावर किंवा प्रवासात आपण १३-१५ रुपयांची पाण्याची बाटली विकत घेतो व पूर्ण प्रवासात जपून वापरतो. कारण त्यासाठी आपण पैसे मोजलेले असतात, पण हीच पाणी वापरायची सवय घरात, आॅफिसात ठेवल्यास वैयक्तिकरीत्या आपण बरेच पाणी बचत करू शकतो.घरी आलेल्या पाहुण्यांना आपण ग्लास भर-भरून पाणी देतो, पण दोन-तीन घोट पिऊन ग्लासातील पाणी फुकट जाते. त्याऐवजी थंड व साध्या पाण्याची बाटली व खाली ग्लास दिल्यास गरजेनुसार पाणी वापरले जाऊन बरेच पाणी आपण वाचवू शकू. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वीं केला जाणारा तांब्या-पेल्याचा व रांजण-ओगराळेचा वापर करून जेवढी पाण्याची गरज असेल तेवढेच पाणी वापरले जायचे व योग्य पाण्याची बचत व्हायची.घरातील लहान मुलांकडूनसुद्धा पाण्याचा बराच अपव्यय होत असतो. वडीलधाऱ्यांनी व शाळेतील शिक्षकांनी मुलांना दैनंदिन पाणी वापराबाबत योग्य सूचना केल्यानेसुद्धा भविष्यात पाण्याची बरीच बचत करता येऊ शकेल व मुलांना पाण्याचे महत्त्व पटवून देता येईल.जेव्हा पाण्याचे नळ घरात आले तेव्हाच पाण्याचा अतिवापर व दुरुपयोग, पाण्याची नासाडी जास्त होऊ लागली. आजही खेडोपाड्यातील गावकरी पहाटे उठून पाणी भरावयास जातात, कित्येक मैल चालून डोक्यावरून पाणी आणले जाते, म्हणून त्यांच्यासाठी पाणी मूल्यवान वस्तू म्हटली जाते.पाण्याने भरलेले हंडे-कळशा, बादल्या ‘पाणी शिळे झाले’ म्हणून फेकून दिल्यानेसुद्धा खूप पाण्याची नासाडी होत असते. झाकून ठेवलेले पाणी कधीही खराब होत नसते. त्यामुळे ते फेकू नका.----------पाण्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी हे कराचपाणी भरताना अनेकदा नळाखाली बादली किंवा भांडे ठेवले जाते व महिला दुसरे काम करण्यास सुरुवात करतात़ त्यात अनेकदा भांडे भरून वाहू लागते़ ते वाहून जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.खूप जण दात घासताना बेसिनचा नळ उघडाच ठेवतात. त्यामुळे अवघ्या एका मग पाणीमध्ये होणाऱ्या कामासाठी चार-पाच मग पाणी वाया घालविले जाते. हे रोखले तर दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते.काही जणांना शॉवरखाली आंघोळ करण्याची भारी हौस असते, अगदी धबधब्याखाली आंघोळीचा आनंद घेतात, पण त्यांच्या लक्षात येत नाही, की आपण किती पाणी वाया घालवतो. त्यामुळे दोन-तीन बादल्या पाणी वाया जाते.हॉटेलमध्ये ग्लासातील पाणी अर्धवट प्यायल्यानंतर बाकीचे पाणी फेकून देतात, त्यापेक्षा हॉटेलमध्ये छोट्या ग्लासात पाणी दिल्यास वाया जाणार नाही़ चोखंदळ पुणेकरांनीही यासाठी आग्रह धरायला हवा.मोठमोठ्या सोसायटीत टाक्या भरून वाहतात, पण एक बॉलकॉक बसविल्यास पाणी वाहणार नाही, थोड्याशा विचाराने, एका बॉलकॉकने आपण कितीतरी पाण्याची बचत करू शकतो आणि हे बॉल कॉक लावणे प्रत्येक सोसायटीला सहज शक्य होण्यासारखे आहे.अनेक जण रस्त्यावर पाण्याचा सडा टाकतात़ पाण्याची टंचाई असताना असे पाणी वाया घालवू नये़---------वाचवू एक एक थेंबपुणे जिल्ह्यात यंदाच्या वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रश्न केवळ पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा नाही तर धरणांमध्ये खूपच कमी पाणीसाठा असल्याने शेतीलाही पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यातून दुष्काळी भागाला पाणी पुरवावे लागणार आहे. पीक करपलं, पक्षी दूरदेशी गेलंगळणाऱ्या झाडांसाठी मन ओथंबलं जिल्ह्याच्या अनेक भागांत वरीलप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आहे. या वेळी आपले कर्तव्य आहे, की पाण्याचा थेंब न थेंब वापरला पाहिजे. आपण, आपली सोसायटी पाणी बचतीसाठी कोणत्या उपाययोजना राबवित आहे ते आम्हाला कळवा. निवडक अभिनव उपाययोजनांना आम्ही प्रसिद्धी देऊ. त्यातून इतरांनाही प्रेरणा मिळून पाणीबचतीची मोहीम अधिक प्रभावी होईल. - संपादक