शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

टेकड्यांच्या सर्वेक्षणाला वर्षभरापासून मिळेना मुहूर्त !

By admin | Updated: May 16, 2015 04:21 IST

आंबेगाव तालुक्यातील माळीणच्या दुर्घटनेनंतर पुणे शहरातील चारही बाजूला असलेल्या टेकड्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला.

पुणे : आंबेगाव तालुक्यातील माळीणच्या दुर्घटनेनंतर पुणे शहरातील चारही बाजूला असलेल्या टेकड्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला. मात्र, या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले तरी अद्याप टेकड्यांच्या सर्वेक्षणाला मुहूर्त मिळालेला नाही. गेल्या आठवड्यात आयुक्त कुणाल कुमार यांनी सर्वेक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, धोकादायक टेकडी सर्वेक्षणासाठी विविध संस्थांकडे विचारणा सुरू करण्यात आली आहे. गोखलेनगर येथील वैदुवाडी येथे वनविभागाची भिंत कोसळली. त्यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी शहरातील टेकड्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. यापूर्वी येरवडा परिसरातील एका वसाहतीवर दरड कोसळली होती. तेव्हापासून महापालिका हद्दीतील टेकड्यांचे व धोकादायक वसाहतींचे सर्वेक्षण करण्याची चर्चा होती. मात्र, माळीण दुर्घटनेनंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत धोकादायक टेकड्यांचे सर्वेक्षण करण्याचा विषय झाला. त्यानंतर प्रशासनाने सर्वेक्षण करण्याची तयारी दाखविली होती. शहरात तळजाई, पर्वती, बिबवेवाडी, रामटेकडी, हनुमान टेकडी, वारजे, वेताळ टेकड्या आहेत. पर्वती व बिबवेवाडी टेकडीच्या परिसरात अतिक्रमण करून वसाहती व झोपडपट्टी झाली आहे. त्यामुळे टेकडींच्या परिसरातील संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिकेने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, प्रशासनाला मुहूर्त सापडत नव्हता. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात काही आमदारांनी शहरातील टेकड्यांवरील अतिक्रमणाचा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने सर्वेक्षणाचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला होता. (प्रतिनिधी)