सोमेश्वरनगर : चालू ऊस गळीत हंगाम चालू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटलमागे तब्बल 200 रूपयांनी कोसळले आहेत. हंगाम सुरू होताना साखरेचे दर 275क् वर होते आता मात्र ते 255क् वर आले आहेत. यामुळे पहिला हप्ता द्यायचा कसा हा प्रश्न अधिक बिकट झाला आहे.
एकीकडे शेतकरी संघटनांची आंदोलनाची भूमिका आणि दुसरीकडे कारखान्यांवर पहिला हप्ता एफआरपी नुसार न दिल्यास फौजदारी ठोकू, असा सहकार मंत्र्यांनी सज्जड दम दिल्यामुळे साखर कारखानदार धास्तावले आहेत.
साखर कारखान्यांना पहिला हप्ता म्हणून शेतक:यांना साखर उता:यानुसार 22क्क् ते 25क्क् रूपये एफआरपी द्यावी लागणार आहे. कारखाने बँकेकडून मिळणा:या पोत्यावरील उचलीच्या पैशातून हा पहीला हप्ता देतात. साखरेचे दर 275क् वर असताना राज्य बँकेने 263क् रूपये साखरेचे मुल्यांकन केले होते. त्यामुळे सभासदांना देण्यासाठी कारखान्यांकडे 1485 रूपये उरत होते मात्र आता हंगाम सुरू झाल्यापासून दुस:यांदा साखरेचे दर कोसळल्याने राज्य बँकेने पुन्हा साखरेचे मु़ल्यांकन कमी करत शेतक:यांना देण्यासाठी कारखान्यांच्या हातात अवघे 14क्5 रूपयेच टेकवले आहेत. यामुळे आता एफआरपी मिळणोही मुश्कील होणार आहे. या हिशोबानुसार कारखाने पहीला हप्ता 18क्क् ते 19क्क् रूपये प्रतिटन देऊ शकतील, अशी सद्य:स्थिती आहे.
गळीत हंगाम सुरू झाला तेव्हा मोठी साखर 2865 रूपये, मध्यम साखर 2735 रूपये तर साधी साखर 2715 रूपये क्विंटल होती. मात्र आता हंगाम सुरू झाल्याने नवीन साखरेचे आवक बाजारपेठेत होऊ लागले. नोव्हेंबरला मोठी साखर 271क् रूपये, मध्यम साखर 261क् रूपये तर साधी साखर 257क् रूपये क्विंटल होती. आज या दरामध्ये सुमारे 5क् रूपयांची घट झाली आहे. त्यामुळे घसरलेले दर पाहता आज अनुक्रमे 2672, 2565 व 255क् रूपयांवर आले आहेत. केंद्र शासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षी 245 लाख टन साखर तयार झाली होती. केंद्र शासनाला कारखान्यांना अनुदान दिल्याशिवाय पर्याय नाही. इथेनॉलला केवळ 1क् टक्के मिश्रणाची परवानगी देऊन चालणार नाही. तसेच कच्च्या साखरेच्या निर्यातीस पुन्हा अनुदान रूपाने प्रोत्साहन दिले पाहीजे. दिवसेदिवस साखर कारखान्यांपुढील अडचणी वाढत चालल्या आहेत. अद्यापही कारखान्याने पहीला हप्ता जाहीर केला नाही. (वार्ताहर)
4चालू हंगामात देशात 25क् लाख टन साखर तयार होण्याचा अंदाज आहे. यातून देशाची साखरेची गरज भागून 75 लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहण्याची भिती व्यकत होत आहे. आशातच 9 लाख टन साखर आयात झाली आहे. आयातशुल्क 4क् टकके करण्याची घोषणा करणा:या केंद्र सरकारने ते अजून 25 टक्केच ठेवले आहे. तर दुसरीकडे कच्ची साखर व साधी साखरेच्या निर्यातीबाबत अनुदान देण्याचे टाळले आहे.