पुणे : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहाराविरोधात पुण्यात झालेल्या आंदोलनाला अखेर आज यश लाभले. या पतसंस्थेचा संंस्थापक-चेअरमन प्रमोद रायसोनी आणि इतर पदाधिकाऱ्यांना आज पहाटे जळगावमध्ये अटक करण्यात आली. बीएचआरच्या गैरव्यवहाराविरोधात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आंदोलन करण्यात आले होते.बीएचआर पतसंस्थेविरोधात राज्यातून सर्वाधिक २२ गुन्हे पुणे शहर आणि जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. शहर आणि जिल्ह्यात मिळून पतसंस्थेविरोधात १०० पेक्षा जास्त तक्रारी करण्यात आल्या. वनाज पोलीस स्टेशनमध्ये १०, डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये ८, तर निगडी पोलीस स्टेशनमध्ये एक असे पुणे शहरात एकूण १९ गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यातील इंदापूर, बारामती आणि नारायणगाव येथील पोलीस स्टेशनमध्येही या पतसंस्थेविरोधात खातेदारांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. रायसोनी आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या अटकेमुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील खातेदार आणि ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.पुण्यातील तक्रारदार सुरेश कोल्हापुरे यांनी चेक बाऊन्स झाल्या प्रकरणी बीएचआर पतसंस्थेच्या संचालकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्यात अटक टाळून जामीन मिळवण्यासाठी संचालकांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यात त्यांना अद्यापही यश आलेले नाही. पुण्यातील ठेवीदार दीपा सुरेश गुरूनानी यांनी पतसंस्थेविरोधात ‘मुदत संपलेल्या ठेवींची रक्कम परत केली नाही,’ म्हणून डेक्कन पोलिसांत मागील वर्षी १५ डिसेंबर रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे संस्थापक-चेअरमन प्रमोद रायसोनी, सर्व संचालक, सरव्यवस्थापक आणि इतरांविरोधाात १९९९च्या महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटरेस्ट आॅफ डिपॉझिटर्स अॅक्टच्या (एमपीआयडी) कलम ३ अन्वये ६ जानेवारी रोजी पहिला गुन्हा दाखल झाला होता. बीएचआर पतसंस्थेद्वारा फसवणूक झालेल्या कर्जदार आणि ठेवीदारांच्या समन्वय समितीने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला. समितीचे राज्य संघटक दामोदर दाभाडे आणि पुणे विभाग अध्यक्ष किरण दीक्षित यांनी आज जिल्हा उपनिबंधक प्रदीप बर्गे यांच्याकडे आपले म्हणणे मांडले.या भेटीदरम्यान त्यांनी संस्थेच्या कलम १०८ अन्वये झालेल्या वैधानिक लेखा परीक्षणात संचालक व काही खातेदार यांनी संगनमत करून मनी लाँड्रिंग अॅक्ट आणि आयकर अधिनियमाचा भंग केल्याचे निदर्शनास आणून दिले. याविरोधात सहकार आयुक्तांनी पतसंस्थेच्या विरोधात तक्रार दाखल करावी, अशी मागणी समन्वय समितीने केली. (प्रतिनिधी)४सहकारी विभागाच्या वैधानिक लेखा परिक्षणातून घोले रोड शाखेत १,६०७ कोटी रुपयांच्या ठेवीचा बेनामी व्यवहार २०१३ च्या जून महिन्यात पुढे आला होता. केंद्रीय सहकारी निबंधकांकडे याबाबतची कारवाई प्रस्तावित आहे, अशी माहिती समितीचे पुणे विभाग अध्यक्ष किरण दीक्षित यांनी दिली. एकट्या घोले रोडवरील शाखेत इतकी ठेव असल्यास सर्व शाखांत मिळून किती ठेवी असतील, हे कोडेच आहे.४महाराष्ट्रासह ५ राज्यांत २६४ शाखा असलेल्या बीएचआर पतसंस्थेचा एकूण व्यवहार सुमारे ७ हजार कोटी रुपये इतका आहे.४पुणे जिल्ह्यात ३० शाखा. यापैकी १४ शहरात, तर १६ जिल्ह्यात.४शहर-जिल्ह्यातील एकूण ठेव : सुमारे ४५० कोटी रुपये.४शहर-जिल्ह्यातील सर्व प्रकारचे ठेवीदार खातेदार, कर्जदार : सुमारे ३,५००
बीएचआर विरुद्धच्या आंदोलनाला यश
By admin | Updated: February 2, 2015 23:11 IST