२१ व्या शतकाचा व कोवीड काळात वेगळा विचार करून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत तंत्रज्ञानाचे देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरून मार्गदर्शन मिळावे यासाठी स्पेस (अंतराळ) एक्सप्लोरेशन या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये आयडीवायएम फॉउंडेशनचे संस्थेचे संस्थापक रविशंकर,विशाल कहर,बिश्वनाथ,नेत्रा यांच्यासह देश - विदेशातील तज्ञ व आयआयटीचे काही लोकांनी अमेरिकेतून विद्यार्थ्यांशी संवाद साधत रॉकेटशी निगडित माहिती व प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
आयडीवायएमच्या माध्यमातून रॉकेट कसे बनवावे,रॉकेटचे प्रात्यक्षिके,रॉकेटमध्ये असणाऱ्या सर्व उपकरणें,इंधन आदीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.तसेच अंतराळ व त्याच्याशी संबधीत वेगवेगळ्या उपक्रमांत विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला व त्या विषयांबद्दल जिज्ञासा निर्माण केली. यावेळी
विद्यार्थ्यांशी
विद्याव्हॅली संस्थेचे अध्यक्ष शामराव देशमुख यांनी संवाद साधला
प्राचार्या स्वाती रणदिवे, सचिव रोहिणी देशमुख, संचालिका हर्षल देशमुख, अक्षयराज देशमुख, माधुरी घोडेकर, दीपक शिंदे, हर्षा वैद्य आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाईन आणि ऑफलाईन उपस्थित होते.
-------------------------------------------------------
फोटो १२चाकण विद्याव्हॅली
फोटो ओळी : ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी शिक्षक
120721\12pun_10_12072021_6.jpg
फोटो १२चाकण विद्याव्हॅलीफोटो ओळी : ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी शिक्षक.