पिंपरी : अकरावीची दुसरी गुणवत्तायादी शनिवारी सायंकाळी जाहीर झाली. त्यातून सोमवार व मंगळवारी असे दोन दिवस प्रत्यक्ष प्रवेशअर्ज भरता येतील. पालक किंवा विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालत जाऊन प्रवेश निश्चित करावा अन्यथा ते प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडतील. महाविद्यालय पसंतीक्रमानुसार शनिवारी दुसरी गुणवत्तायादी केंद्रीय प्रवेश समितीच्या संकेतस्थळावर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सूचनाफलकावर यादी लावली आहे. यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. त्यासाठी केवळ ५0 रुपये भरून अर्ज दाखल करायचा आहे. दुसर्या यादीत बेटरमेंटसाठी विद्यार्थी प्रयत्न करू शकतात. बेटरमेंटचा पर्याय वापरताना विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत उपलब्ध झालेल्या जागेवरील प्रवेश रद्द करावा लागणार आहे. दुसर्या यादीची प्रवेशप्रक्रिया केवळ दोनच दिवस आहे. सकाळी १0 ते दुपारी ४ ही प्रवेशअर्ज दाखल करण्याची वेळ आहे. (प्रतिनिधी)
दुसर्या यादीतील विद्यार्थ्यांना आजपासून प्रवेश
By admin | Updated: July 7, 2014 05:46 IST