ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या पुढाकाराने दौंड येथे अपंग मेळावा घेण्यात आला होता. त्यावेळी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, जिल्हा अपंग संस्थेचे उपाध्यक्ष रामेश्वर मंत्री आदी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले की, अपंगांना नेहमीच मानसिक, शारीरीक तसेच आर्थिक मदतीची आवश्यक्ता असते तेव्हा अपंगांच्या हक्कासाठी शासन निश्चीतच अपंगांच्या पाठीशी राहील. गटविकास अधिकारीअजिंक्य येळे यांनी या मेळाव्यात आपंगांच्या पाच टक्के निधीचा अहवाल सादर करुन हा निधी तातडीने अपंगाना देण्यात यावा अशा सुचना तालुक्यातील ग्रामपंचायतींना केल्या. पुणे जिल्हा अपंग संस्थेचे उपाध्यक्ष रामेश्वर मंत्री म्हणाले की, भविष्यात अपंगांवर अन्याय सहन केला जाणार नाही याची शासनाने दखल घ्यावी. शहरात शासनाने पंगांसाठी वास्तुरुपात अपंग भवन उभारणे काळाची गरज आहे.
यावेळी अपंग संघनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव ,जेष्ठनगरसेवक प्रेमसुख कटारिया , नगरसेवक इंद्रजीत जगदाळे ग्रामीण ऊपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संग्राम डांगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपंग संस्थेचे सुरेखा ढवळे, सुभाष दिवेकर, शहनाज शेख, कलीम तांबोळी गणेश शिंदे यांच्यास गुजराथी भवन, आम्ही दौंडकर या संस्थांचे सहकार्य मिळाले.
माजी नगरसेवक नंदू पवार, सुशिल शहा, मोहन नारंग, ॲड. अमोल काळे, स्वप्नील शहा, निखील स्वामी, नितेश पोकार, भवन पोकार, अशोक जगदाळे उपस्थित होते.