शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गजांना फटका

By admin | Updated: February 24, 2017 03:53 IST

महापालिका निवडणुकीमध्ये आलेल्या कमळाच्या लाटेने राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमहापौर मुकारी अलगुडे, गटनेते व सभागृह

पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये आलेल्या कमळाच्या लाटेने राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमहापौर मुकारी अलगुडे, गटनेते व सभागृह नेते शंकर ऊर्फ बंडू केमसे, भाजपाचे गटनेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, मनसेचे गटनेते किशोर शिंदे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांच्यासह ४५ विद्यमान नगरसेवकांना पराभव पत्करावा लागला आहे. त्याचबरोबर सलग २५ वर्षे सभागृहात असलेल्या कमल व्यवहारे, सुभाष जगताप यांना सभागृहातून बाहेर पडावे लागले आहे. महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागांमधील १६२ जागांसाठी ५५.५० टक्के मतदान झाले. शहरातील १४ निवडणूक कार्यालयनिहाय १४ ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस समसमान जागा मिळवतील, असा अंदाज व्यक्त केला जात असताना भाजपाने राष्ट्रवादीला मागे टाकून सर्वाधिक जागा मिळविल्या आहेत. मुकारी अलगुडे, बंडू केमसे, गणेश बीडकर, अशोक हरणावळ, किशोर शिंदे, बाळासाहेब बोडके, सुभाष जगताप, कमल व्यवहारे, रूपाली पाटील-ठोंबरे, अभिजित कदम, युगंधरा चाकणकर, अश्विनी जाधव, पुष्पा कनोजिया, जयश्री मारणे, सुधीर जानजोत, कमल व्यवहारे, सुशीला नेटके, दत्ता बहिरट, हीना मोमीन, राजू पवार, अजय तायडे, सुनील गोगले, सचिन भगत, उषा कळमकर, भाग्यश्री दांगट, सुरेखा मकवान, शिवलाल भोसले, अस्मिता शिंदे, राहुल तुपेरे, संगीता गायकवाड, कैलास गायकवाड, विजय देशमुख, विजया कापरे, विजया वाडकर, बाबू वागस्कर, वनिता वागस्कर, सुरेखा कवडे, फारूक इनामदार, भरत चौधरी, सनी निम्हण, अर्चना कांबळे, रोहिणी चिमटे, नीता मंजाळकर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या भाजपाच्या गेलेल्या अनेक उमेदवारांनी विजय मिळविला आहे. रेश्मा भोसले, प्रकाश ढोरे, बापूराव कर्णे गुरुजी, सुनीता गलांडे या प्रमुख उमेदवारांसह अनेकांनी विजय संपादन केला. पराभूत होण्याची महापौरांची परंपरा खंडितमहापालिकेच्या गेल्या काही निवडणुकांमध्ये विद्यमान महापौर पराभूत होण्याची मालिका सुरू झाली होती. राजलक्ष्मी भोसले, मोहनसिंग राजपाल यांना महापौर पदावर असताना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र प्रशांत जगताप यांनी महापौरांनी पराभूत होण्याची ही परंपरा खंडित केली आहे. २५ वर्षांची अभेद्य मालिका खंडितगेली २५ वर्षे सभागृह गाजविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभागृह नेते सुभाष जगताप, शहराच्या पहिल्या महापौर कमल व्यवहारे यांना अनपेक्षितरीत्या पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यांची सलग २५ वर्षांची मालिका खंडित झाली आहे.या प्रमुख उमेदवारांनी मिळविला विजयपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या महापौर प्रशांत जगताप, भाजपा गटनेत्यांचा पराभव करणारे जायंट किलर रवी धंगेकर, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे भाजपा पुरस्कृत अपक्ष रेश्मा भोसले, भाजपाच्या माजी गटनेत्या मुक्ता टिळक, माजी उपमहापौर आबा बागुल, स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम, माजी स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी विजयश्री खेचून आणली आहे.चार सदस्यीय प्रभाग पध्दत ठरली हुकमीमहापालिकेची निवडणूक यंदा पहिल्यांदाच प्रभाग पध्दतीने पार पडली. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या पार्श्वभुमीवर भाजपाने ४ सदस्यांचा एक प्रभाग करून महापालिकेसाठी मिनी विधानसभा मतदारसंघ पध्दतीने निवडणुका घेतल्या. या निवडणुका उमेदवारांच्या नावावर न होता पक्षांच्या नावावर व्हाव्यात यासाठी भाजपाने खेळलेली खेळी पूर्णपणे यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.