मडगाव येथे चौदा ते सतरा वर्षांखालील ज्युनिअर सबज्युनिअर प्रकारामध्ये ही स्पर्धा २३ व २४ जानेवारी रोजी पार पडली. या वेळी आळंदीतील व्हिक्ट्री तायक्वोंदो अकॅडमीच्या अकरा मुलांनी स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये श्रेयश हुलजुले, ऋग्वेद पवार, ओमकार पवार, शौर्य मलघे, श्लोका हुलजुले, मिताली गभाले, संस्कृती वाघे या सात जणांना सुवर्ण, तर ओमकार काटे, नीरज गभाले, आर्या मलघे, आदित्य शिंदे या चार जणांना रौप्यपदक मिळाले.
तायक्वोंदो प्रशिक्षक सुमित खंडागळे आणि स्नेहा देसाई यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अॅकॅडमीच्या वतीने प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. सुवर्णपदक विजेता ओमकार पवार याचे धानोरे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे यांनी अभिनंदन केले.
राष्ट्रीय तायक्वोंदो स्पर्धेत आळंदीतील व्हिक्ट्री तायक्वोंदो अकॅडमीचे सुवर्ण व रौप्यपदक विजेते जल्लोष करताना.