पुणो : वनस्पती आणि सुक्ष्म जीवांचा वापर करून मैलापाणी शुद्ध करून त्या पाण्याचा वापर उद्यानांसाठी करण्याच्या प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प उभारण्यास आज स्थायी समितीने मान्यता दिली. हा प्रकल्प इंडो युरोपियन रिसर्चअंतर्गत नावाटेक या नावाने राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तसेच युरोपीयन कमिशन यासाठी महापालिकेस मदत करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णेगुरुजी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. हा संपूर्ण प्रकल्प या संस्थाच्या निधीतूनच उभारला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून हा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आला होता.
नावाटेक प्रकल्पांतर्गत पुणो व नागपूर शहरात विविध ठिकाणी अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. पुणो शहरात शिवाजीनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे 18क् किलोलिटर प्रतिदिन, हडपसर येथील अॅमानोरा टाऊनशीपमध्ये 4क् किलो लिटर, पूलगेट येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे 25क् आणि राजेंद्रनगर येथील इंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व शिक्षण केंद्र येथे 5क् किलोलिटर प्रतिदिन अशा चार ठिकाणी छोटय़ा स्तरावर हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार. या प्रकल्पांसाठी सांडपाणी, तसेच प्रकल्पाच्या परिसरातील नाल्याचे पाणी वापरण्यात येणार आहे. महापालिकेचे इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र आंबिल ओढय़ालगत आहे.
या ओढय़ातील पाणी घेऊन त्यावर इको तंत्रज्ञान प्रक्रिया करण्यासाठी इमारतीच्या मागील बाजूस 33 बाय 3 मीटर अशी जागा लागणार आहे. पर्यावरण केंद्रास भेट देणा:या नागरिकांना व शालेय विद्याथ्र्यांना अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर होत असताना प्रत्यक्षपणो पाहणो शक्य होणार आहे. डिसेंबर 2क्15 पयर्ंत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पाची उपयुक्तता पाहून शहरात आणखी काही ठिकाणी तो उभारण्याबाबत निर्णय घेतला जाईल.(प्रतिनिधी)
प्रक्रियायुक्त पाणी उद्यानांसाठीच
या प्रकल्पाअंतर्गत द्विस्तरीय जैव मृदास्तर गाळणीद्वारे दूषित पाण्यातील सेंद्रिय घटकांचे सूक्ष्मजीवांद्वारे विघटन होळन त्यातून निर्माण होणारी पोषक तत्त्वे वनस्पतींची मुळे शोषून घेतील. मुळाशी असलेल्या सूक्ष्मजीवांच्या क्रियेने रोगजंतू नष्ट होऊन सांडपाण्याचे शुद्धीकरण होणार आहे. प्रक्रिया केलेले सांडपाणी बाग व झाडांसाठी वापरण्यात येणार आहे.