याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : पिंपळगाव खडकी गावच्या हद्दीत सुनील पांडुरंग पोखरकर (वय38) ,भागा महादू बांगर ( वय 65 ), गजानन आबाजी पोखरकर (वय 40 सर्व रा .पिंपळगाव ता.आंबेगाव ) हे चोरून अवैधरीत्या देशी-विदेशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांना समजली. त्यानंतर पोलीस कर्मचारी कैलास कड, पोलीस नाईक नीलेश खैरे यांनी दोन पंचांना समवेत घेऊन सदर ठिकाणी कारवाईसाठी घटनास्थळी गेले. त्यावेळी सुनील पांडुरंग पोखरकर यांच्या घरात तपासणी केली असता 2 हजार 760 रुपयांची देशी विदेशी दारु सापडली आहे. भागा महादू बांगर याच्या राहत्या घरात 936 रुपयांची देशी विदेशी दारू जप्त केली. तसेच गजानन आबाजी पोखरकर याचे राहत्या घरातून 3 हजार 812 रु असा तिन्ही ठिकाणी एकूण 7,508 रुपयांचा माल ताब्यात घेतला आहे.याबाबत पोलीस नाईक नीलेश खैरे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस कैलास कड करत आहे.
अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या तीन अड्ड्यांवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:10 IST