शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी विचारांचा भारतभर प्रसार पुण्यातूनच

By admin | Updated: March 16, 2017 01:47 IST

पुणे शहर समाजकारण आणि राजकारणाबाबत देशात आघाडीवर आहे. पेशवाई असलेल्या सनातनी पुण्यात निर्माण झालेल्या क्रांतिबीजाचा, समाजकारणाचा विचार करावा लागेल

पुणे शहर समाजकारण आणि राजकारणाबाबत देशात आघाडीवर आहे. पेशवाई असलेल्या सनातनी पुण्यात निर्माण झालेल्या क्रांतिबीजाचा, समाजकारणाचा विचार करावा लागेल, असे सांगून वैद्य म्हणाले, ‘‘महात्मा फुले यांचा विचार त्यादृष्टीने मोलाचा आहे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी त्यांच्या ‘शतपत्रे’मधून अंधश्रद्धा, विकृत रूढी-रिवाज यांच्यावर कठोर हल्ले केले. महात्मा फुले यांनी केवळ विचार न मांडता कृतीतून सामाजिक सुधारणा केल्या. या सुधारणांना तेव्हा प्रचंड चालना मिळाली.१८४८मध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा याच पुण्यात सुरू केली. ती भारतीयांनी सुरू केलेली पहिली मुलींची शाळा. सावित्रीबाई फुले यांना शिकवून मुलींना शिकविण्यासाठी तयार केले. त्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत. फातिमाबी शेख यांनाही शैक्षणिक चळवळीत त्यांनी ओढून घेतले.’’भाई वैद्य म्हणाले, ‘‘आज देशात करोडो स्त्रिया शिकल्या. फार महत्त्वाच्या पदांवर काम करू लागल्या. बँका, वायुदल, लष्कर, राजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्या चमक दाखवीत आहेत. सुधारणेची इतकी मोलाची बीजे जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी रोवली. ते एवढेच करून थांबले नाहीत, तर १८५१मध्ये पददलितांसाठी शाळा सुरू करून त्यांनी सनातन्यांचा रोष ओढवून घेतला. चातुर्वर्ण्य निर्माण करून ब्राह्मणांनी विकृत रूढी-रिवाज निर्माण केले, याबद्दल बहुजन समाज जाब विचारू लागला. कालांतराने फुले यांचा विचार देशभर पोहोचला. अनेक राज्यांमध्ये त्यांचे वाङ्मय गेले. त्यांचे पुतळे उभारले गेले. त्यांच्या प्रभावामुळे बहुजन समाजातून अनेक नेते निर्माण झाले. शाहूमहाराज यांच्यावरही त्यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीला जोर चढला. या चळवळीचे पुणे हे केंद्र होते. जेधे बंधू यांच्या जेधे मॅन्शनमध्ये हे केंद्र कार्यान्वित होते.शाहूमहाराज यांच्या प्रभावामुळे सामाजिक सुधारणांना अधिक चालना मिळाली.’’ भाई वैद्य म्हणाले, ‘‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यताविरोधी चळवळ गतिमान केली. १९०६मध्ये डिप्रेस्ड क्लास मिशन सुरू करून शिंदे स्वत: दलित वस्तीमध्ये राहिले. १९१७मध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावरून त्यांनी अस्पृश्यताविरोधी जाहीरनामा प्रकट केला. काँग्रेसच्या नेत्यांच्या त्यावर सह्या होत्या. त्यांचे कार्य पुणे शहरात असले, तरी देशभर त्याचा प्रभाव निर्माण झाला. या विविध प्रयत्नांमुळे पुणे शहर सामाजिक सुधारणांबाबत आघाडीवर राहिले. पेशवाईच्या पार्श्वभूमीवरच्या शैक्षणिक, समतेच्या चळवळी अत्यंत परिणामकारक ठरल्या. स्त्रिया, दलित आणि एकूणच बहुजन सक्रिय पद्धतीने या चळवळींमध्ये सहभागी झाला. पर्वतीवरच्या मंदिरातील दलितांच्या प्रवेशाची चळवळ एस. एम. जोशी, शिवराम जानकू कांबळे यांनी सुरू केली. ‘भाला’कार भोपटकर यांनी त्यांना विरोध केला; मात्र सुधारकांनी त्यांना जुमानले नाही.’’स्त्रियांच्या पुनर्विवाहाची चळवळ पुण्यातच सुरू झाली. मुस्लिम समाजात सुधारणा करण्यासाठी हमीद दलवाई यांनी याच पुण्यात मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून चळवळ सुरू केली. समान नागरी कायदा, तलाकविरोधी कायदा यांचा अंतर्भाव असलेल्या या चळवळीला आज जोर आला आहे. दलित समाजातील शिवराम जानकू कांबळे, न्यायमूर्ती भोळे, पां. ना. राजभोज असे नेते पुण्यात उदयास आले.’’