शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पालकांचा खिसा होतोय खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2016 01:06 IST

शासनाने संस्थाचालकांना उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फीचे निकष ठरवून दिले आहेत. मात्र, विनाअनुदानित तुकड्यांच्या नावाखाली पालकांची लूट केली जात आहे.

भोर : शासनाने संस्थाचालकांना उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फीचे निकष ठरवून दिले आहेत. मात्र, विनाअनुदानित तुकड्यांच्या नावाखाली पालकांची लूट केली जात आहे. यामुळे सर्वसामांन्य पालकांचा खिसा रिकामा होत असून, त्याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.राज्यातील मुलामुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून शासनाच्या शिक्षण विभागाकडून अनेक प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रामुख्याने यात मुलींना प्राथमिक ते उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण मोफत देणारी एक योजना आहे; मात्र मुलींना या योजनेतून खरेच मोफत शिक्षण मिळते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने शिक्षण संस्थाचालकांना विनाअनुदानित तुकड्यांना (वर्गांना) मान्यता देऊन त्यांना एक प्रकारची वरकमाई करण्याचे साधन निर्माण करून दिले असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.भोर तालुक्यातील ग्रामीण भागातील सुमारे पाच ते साडेपाच हजार विद्यार्थी उच्च माध्यमिक शिक्षण घेत असून शासनाच्या या धोरणाचा फटका मुलामुलींना बसत आहे. अनेक संस्थाचालक दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली पालकांच्या पैशाची लूट करतात, तर काही संस्थांकडून फी घेतली जाते; मात्र तिची पावती दिली जात नाही. मग हे पैसे संस्थेला जातात की कुणाच्या खिशात, असाही प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत.या विषयाच्या तक्रारी अनेक पालक खासगीत करीत आहेत; मात्र आपल्या पाल्याचे नुकसान होऊ नये म्हणून उघड बोलत नाहीत. पण, काही जणांनी शिक्षण आयुक्त व शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार करून संस्थांच्या चौकशीची मागणी केली आहे. यात भोर शहरातील काही संस्थांचा समावेश आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवरच शिक्षण संस्था चालत असून, शासन अनुदानित तुकड्यांची संख्या वाढविण्याऐवजी विनाअनुदानित तुकड्यांना मान्यता देत आहे. म्हणजे शासन खासगीकरणाचे धोरण आवलंबत आहे. संस्थाचालक विनाअनुदानित तुकड्यांच्या मान्यतेवर तुटपुंज्या पगारावर शिक्षक प्राध्यापकांची नेमणूक केली जाते. त्यासाठी लागणारा पैसा शासनाच्या फीच्या निकषाला बगल देऊन विविध मार्गांनी पालकांकडून वसूल केला जात आहे. यातूनच पालक व विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे चित्र भोर तालुक्यातील दुर्गम डोगरी भागातही पाहावयास मिळत आहे.तालुक्यात १३ उच्च माध्यमिक विद्यालये असून, ५ ते ६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर उच्च माध्यमिकमध्ये प्रवेश घेताना या विनाअनुदानित तत्त्वावरील तुकड्यांच्या नावाखाली खरे तर पालकांची लूट केली जात आहे. ११वी कला शाखेसाठी ३५० रुपये, वाणिज्यसाठी ६ हजार रुपये, विज्ञान शाखेसाठी ६,५०० रुपये अशी फी आकारण्याची परवानगी आहे. मात्र, संस्थाचालक सर्रास १२ ते १८ हजार रुपये फीची मागणी करून विद्यार्थ्यांची व पालकांची एकप्रकारे आर्थिक पिळवणूक करीत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता असतानाही त्याला आर्थिक परिस्थितीमुळे विज्ञान शाखेऐवजी कला किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यावा लागतो.