सांस्कृतिक महोत्सवासह 'श्रीं'च्या दर्शनाचा ऑनलाईन लाभ ;श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा निर्णय  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 05:20 PM2020-08-11T17:20:09+5:302020-08-11T17:21:05+5:30

सर्व धार्मिक विधी पारंपारिक पद्धतीने होणार. *बाप्पा’च्या दर्शनासाठी गणेशभक्तांना मंदिरात, मांडवात प्रवेश दिला जाणार नाही. 

Online benefit of Darshan with Cultural Festival; Decision of Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust | सांस्कृतिक महोत्सवासह 'श्रीं'च्या दर्शनाचा ऑनलाईन लाभ ;श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा निर्णय  

सांस्कृतिक महोत्सवासह 'श्रीं'च्या दर्शनाचा ऑनलाईन लाभ ;श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा निर्णय  

Next
ठळक मुद्देपहिला ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान रंगणार

पुणे: भारतातील पहिल्या सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने १२९ व्या वर्षानिमित्त पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, हा महोत्सव २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान रंगणार असल्याची माहिती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, उपाध्यक्ष बाळासाहेब निकम, सचिव दिलीप आडकर, लीड मीडियाचे विनोद सातव आदी मान्यवर उपस्थित होते. 

महोत्सवामध्ये सुप्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांच्यासह युवा गायक राहुल देशपांडे यांच्या खास गायकीचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. आंतराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक पं. विजय घाटे, प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांची जुगलबंदी अविस्मरणीय ठरणार आहे. याशिवाय सुप्रसिद्ध गायक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांची सुगम व मेलडियस गाण्यांची श्रवणीय मैफल तर सुप्रसिद्ध लोककलावंत नंदेश उमप आणि गणेश चंदनशिवे हे या सांस्कृतिक महोत्सवात लोककलेचे, लोकगीतांचे विविध रंग उलगडणार असून, ‘लिटिल चॅम्प’ फेम युवा गायक प्रथमेश लघाटे, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी यांची सुरेल मैफल गणेशभक्तांची मने जिंकणारी ठरेल. तसेच महोत्सवामध्ये महापौर मुरलीधर मोहोळ, सह-पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे आणि सुप्रसिद्ध संगीतकार अजय – अतुल यांच्या मुलाखतीमधून गणेशोत्सवाबाबत संवाद साधणार आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, श्रुती मराठे, भार्गवी चिरमुले, मिलिंद कुलकर्णी आणि विनोद सातव करणार आहेत. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, पुणेच्या www.shrimantbhausahebrangariganpati.com या अधिकृत संकेतस्थळावर हा महोत्सव अनुभवता येणार आहे. 

....... 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा उत्सव मोठा नाही, यामुळे अनेक सेवेकऱ्यांची सेवा श्री गणेशाच्या चरणी होणार नसली तरी आम्ही या सेवेकऱ्यांना दरवर्षीच्या सेवेची जाणीव ठेवत त्यांना ‘कृतज्ञता मानधन’ देणार आहोत, यामध्ये बैलजोडीचे मालक, मांडव, साऊंड, लाईट आदी सेवेकऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे यांनी दिली. .

... 

महोत्सवाची ठळक वैशिष्टये

 *श्री गणरायांची प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन सभामंडपातच केली जाणार. 

*सर्व धार्मिक विधी पारंपारिक पद्धतीने होणार. *बाप्पा’च्या दर्शनासाठी गणेशभक्तांना मंदिरात, मांडवात प्रवेश दिला जाणार नाही. 

* सांस्कृतिक महोत्सवासह गणरायांच्या दर्शनाचा आणि आरतीचा लाभ फक्त ऑनलाईन घेता येणार.

Web Title: Online benefit of Darshan with Cultural Festival; Decision of Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.