याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यशवंत श्रीहरी शिवभक्त व त्यांचे कुटुंबीयांनी रात्रीचे जेवण झाल्यावर तळघराच्या खोलीला कुलूप लाऊन खोलीत झोपण्यासाठी गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजात यशवंत हे खाली आले तेंव्हा त्यांना खोलीचा कोयंडा कापलेला दिसला व दार उघडे दिसले. आत जावून खात्री पाहिल्यावर घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील डब्यामध्ये ठेवलेले २१ हजार रु रोख, पर्समधील तीने ३ तोळे वजनाचे मंगळसुत्र, नऊ हजारांचे सोन्याचे झुबे, १५ हजारांचे झुबे, सोन्याच्या रिंगा, २००० रुपयांचे चांदीच्या वस्तु, चांदीचे निरांजन, चांदीचे दोन करंडें, देव पूजेचे चांदीचे साहीत्य, पर्स मधील तीन हजारांची रोकड, रोख पेपर व्यवसायासाठी लागणारी ५,००० किंमतीची सुट्टे पैसे (चिल्लर) अशी एकूण एक लाख ६६ हजारांची सोन्याची वस्तू चोरीला गेली.
भोरमध्ये घरफोडी दीड, लाखांचे ऐवज लंसाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST