शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

भेंडी, गवार, दोडका, काकडी, कारली, वांगी, सिमला मिरची, तोंडली, घेवड्याचे भाव घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:08 IST

पुणे : भेंडी, गवार, दोडका, काकडी, कारली, वांगी, सिमला मिरची, तोंडली, घेवड्याच्या भावात घट झाली आहे. साधरण १०-२० टक्क्यांपर्यंत ...

पुणे : भेंडी, गवार, दोडका, काकडी, कारली, वांगी, सिमला मिरची, तोंडली, घेवड्याच्या भावात घट झाली आहे. साधरण १०-२० टक्क्यांपर्यंत भाव घटल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच फळभाज्यांच्या भावातही घट झाली आहे. तर केवळ हिरवी मिरचीचे दर वाढले आहेत. रविवारी मार्केट यार्डात नेहमीच्या तुलनेत म्हणजे १०० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली आहे.

तरकारी विभागात कोरोनाकाळातील सर्वांत मोठी फळभाज्यांची आवक झाली आहे. मात्र, त्या तुलनेत मागणी कमी असल्याने भेंडी, गवार, दोडका, काकडी, कारली, वांगी, सिमला मिरची, तोंडली आणि घेवड्याच्या भावात सुमारे १० ते २० टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली आहे. तर, केवळ हिरवी मिरची महागली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

परराज्यातील आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक येथून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटक येथून कोबी २ ते ३ टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, इंदौर येथून गाजर ७ ते ८ टेम्पो, कर्नाटक येथून २ ते ३ टेम्पो घेवडा, कर्नाटक येथून १०० गोणी मटार, कर्नाटक येथून पावटा २ ते ३ टेम्पो, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी ४ ते ५ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची ७ ते ८ ट्रक इतकी आवक झाली.

सातारी आल्याची १२०० ते १३०० पोती, भेंडी ८ ते १० टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टॉमेटोची सहा ते सात हजार पेटी, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, भुईमूग शेंग १५० पोती, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, मटार ३० ते ४० गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, गावरान कैरी २ ते ३ टेम्पो, कांदा ४० ते ४५ ट्रक, आग्रा, इंदौर आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची ५० ट्रक इतकी आवक झाली.

---

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :-

कांदा : १६०-२००, बटाटा : ८०-१२०, लसूण : ३००-१०००, आले सातारी : १००-२००, भेंडी : १००-२००, गवार : गावरान व सुरती १५०-२५०, टोमॅटो : ५०-८०, दोडका : १५०-२००, हिरवी मिरची : ४००-४५०, दुधी भोपळा : १२०-१६०, चवळी : १५०-२००, काकडी : १००-१५०, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी : १००-१२०, पापडी : २५०-३००, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : १००-१५०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : १०-२००, तोंडली : कळी १५-२००, जाड : ८०-१००, शेवगा : ४००-४५०, गाजर : २००-२२०, वालवर : ३००-३५०, बीट : १००-१२०, घेवडा : ४००-४५०, कोहळा : १००-१५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : १४०-१५०, ढेमसे : १५०-२००, मटार : स्थानिक आणि परराज्य : ८००-१०००, पावटा : ३००-४००, तांबडा भोपळा : ६०-१००, कैरी : तोतापुरी १६०-१८०, गावरान : १००-१५०, सुरण : १८०-२२०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.