अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री महागणपतीला १००१ मोसंबीचा नैवेद्य करण्यात आला.
पहाटे ५ वा. अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली. देवस्थानच्या वतीने दुपारी १२ वा. महापूजा व महानैवेद्य करण्यात आला.
गणेशभक्त विनायक ठमाजी मलगुंडे यांजकडून विनायकी चतुर्थीनिमित्त महागणपतीस १ हजार १ मोसंबीचा महानैवेद्य व गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.
कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद असून "श्रीं"ची दैनंदिन पूजा, धार्मिक विधी नित्यनियमाने सुरू आहेत. त्यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ ॲड. विजयराज दरेकर, डॅा. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबणीस संतोष रणपिसे तसेच पुजारी मकरंद कुलकर्णी व पुजारी प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.
अंगारकी विनायक चतुर्थीनिमित्त श्री महागणपतीला मोसंबीचा नैवेद्य.