शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

आता मोबाईल सांगणार हवेतील ‘विषारीपणा’!

By admin | Updated: February 17, 2015 01:12 IST

आता आपल्या शहराच्या कोणत्या भागातील हवेत किती प्रदूषण आहे, किती विषारी तत्त्वे आहेत व त्याचा शरीरावर काय परिणाम होईल,

पुणे : आता आपल्या शहराच्या कोणत्या भागातील हवेत किती प्रदूषण आहे, किती विषारी तत्त्वे आहेत व त्याचा शरीरावर काय परिणाम होईल, याची माहिती अजूनही मोबाईलवर मिळत नाही. पण आता दिल्ली आणि पुण्यातील नागरिकांना मोबाईल ही माहिती पुरविणार आहे. यासाठी पाषाण येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान विज्ञान संस्थेने (आयआयटीएम) खास मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. विशेष म्हणजे, हे अ‍ॅप ही माहिती देण्याबरोबर आरोग्यपूर्ण सल्लाही देणार आहे. देशातील अशा प्रकारचे हे पहिलेच अ‍ॅप असणार आहे.शहरांमधील तापमान, हवामानाबरोबर वेगवेगळ्या ठिकाणच्या हवेतील प्रदूषणांची माहिती देण्यासाठी आयआयटीएमने सिस्टीम फॉर एअर क्वॉलिटी फोरकास्टिंग अ‍ॅन्ड रिसर्च (सफर) हा प्रकल्प हाती घेतला. २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेच्या मुहूर्तावर दिल्लीत सफर हा प्रकल्प सुरू केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुणे, मुंबई, चेन्नई, कोलकता, अहमदाबाद या शहरांत सफर हा प्रकल्प सुरू केला. याअंतर्गत शहरांच्या विविध भागांत मॉनिटरिंग सिस्टीम उभारण्यात आल्या आणि मोठे एलईडी टीव्ही लावण्यात आले असून, त्यावर तापमान, हवामानाबरोबर हवेतील विविध तत्त्वांची माहिती देण्यात येत आहे. हा प्रकल्प गेल्या ५ वर्षांपासून उत्तमरीत्या सुरू असून त्यातील पुढील टप्पा म्हणून आता मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे.याबाबत सफर प्रकल्पाचे प्रमुख डॉ. गुफ्रान बेग ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, की केंद्रशासनाचा सफर हा उपक्रम गेल्या ५ वर्षांपासून उत्तमरीत्या सुरू असून, त्यातून मिळणाऱ्या माहितीमुळे संशोधनास मदत होत आहे. सफरकडून दिली जाणारी माहिती नागरिकांना आपल्या मोबाईलवर मिळावी यासाठी सफर एअर अ‍ॅप विकसित करण्यात आला आहे. हा मोफत असून पहिल्या टप्प्यात दिल्ली आणि पुणे येथे हा अ‍ॅप सुरू करण्यात येईल. या अ‍ॅपवर शहराच्या विविध भागांमधील हवेतील विषारी तत्त्वांची माहिती मिळेल. त्याचा शरीरावर काय परिणाम होईल आणि त्यासाठी काय काळजी घ्याल, यासंदर्भातील सल्लाही दिला जाईल. देशातील अशा प्रकारचे हे पहिलेच अ‍ॅप असणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एप्रिल महिन्यात मुंबईत हे अ‍ॅप सुरू करण्यात येईल. (प्रतिनिधी)सफर एअर अ‍ॅपमध्ये ही माहिती मिळणारसफर एअर अ‍ॅपमध्ये शहराच्या विविध भागांमधील तापमान, हवामानाचा अंदाज दिला जाणार आहे. त्याबरोबर त्या भागातील ओझोनचे प्रमाण, आॅक्साइड आॅफ नायट्रोजनचे (एनओएक्स) प्रमाण, कार्बन मोनॉक्साइडचे (सीओ) प्रमाण, हवेतील धूलिकणांचे प्रमाण (पीएम २.५, १०), ब्लॅक कार्बनचे (बीसी) प्रमाण आदींची सखोल माहिती दिली जाणार आहे. हे प्रमाण किती असले तर नॉर्मल आहे, किती झाले तर त्याचा शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो, याचीही माहिती दिली जाणार आहे.