शिरूर : दलित साहित्य हे महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नसून, सर्व प्रदेशांतून दलित साहित्याची निर्मिती होत आहे. त्याचा प्रचंड वटवृक्ष निर्माण होतोय. या दलित साहित्याच्या बदलण्याच्या दिशाच आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणो यांनी येथे केले. या साहित्याचे समीक्षेद्वारे योग्य ते मूल्यमापन होत नसल्याची खंत मात्र पानतावणो यांनी या वेळी व्यक्त केली.
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दलित साहित्याच्या बदलत्या दिशा’ या विषयावर दोन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्रचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रचे उद्घाटन डॉ. पानतावणो यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘दलित साहित्यात बदलत्या जाणिवा, नवे वा्मयकृती निर्माण होत आहेत. यात नवनवे अंकुर पाहावयास मिळत आहेत. दलित हे जातीचे नव्हे, तर जाणिवांचे साहित्य आहे. या जाणिवा समजून या साहित्याचा निर्लेपपणो आस्वाद घेतला आला पाहिजे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात नियामक मंडळाचे सदस्य चंद्रकांत बाफणा म्हणाले, ‘‘साहित्यात समाजाचे प्रतिबिंब असून नव्या पिढीला प्रेरणा देणारे साहित्य निर्माण होत राहिले पाहिजे.’’ प्रास्ताविकात प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत म्हणाले, ‘‘दलित साहित्याच्या बदलत्या दिशा या राष्ट्रीय चर्चासत्रतून वा्मयीन प्रवाहाला दिशा देणारे शोधनिबंध सादर होणार आहेत. मराठी साहित्याचे संशोधक, अभ्यासक व विद्यार्थी यांना ते प्रेरणादायी ठरेल.’’ पहिल्या चर्चासत्रत ‘दलित आत्मकथन : बदलत्या दिशा’ या विषयावरील शोधनिबंधाचे वाचन करण्यात आले. गुलबर्गा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. भालचंद्र शिंदे हे अध्यक्षस्थानी होते. तिस:या सत्रत ‘दलित कविता : बदलत्या दिशा’ या विषयावरील शोधनिबंधाचे वाचन करण्यात आले.
दरम्यान, या वेळी ‘इंटरनॅशनल जर्नल’ या दलित साहित्याच्या बदलत्या दिशा या विषयावरील शोधनिबंधाचा समावेश असलेल्या पुस्तकाचे प्रकाश डॉ. पानतावणो यांच्या हस्ते करण्यात आले. (वार्ताहर)