अनेक वर्ष पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील रस्ते वर्षानुवर्षे खराब झाले होते. रस्ते दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली होती. यामुळे पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळविली असल्याची माहिती माळशिरस गावचे सरपंच महादेव बोरावके व माजी उपसरपंच माऊली यादव यांनी दिली. यामुळे गेली अनेक वर्ष माळशिरस ते नायगाव रस्ता खराब झाला होता. त्याचबरोबर माळशिरस ते राजुरी रस्ता हा देखील अतिशय खराब झाला होता. या रस्त्यावरून भुलेश्वर , नायगाव येथील सिद्धेश्वर मंदिर, पांडेश्वर येथे असणारे पांडवकालीन शिवमंदिर, जेजुरीकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होत आहे . त्याचप्रमाणे माळशिरस ते राजुरी रस्त्यावरून अष्टविनायक पैकी एक असणारे मोरगाव या ठिकाणी जाण्यासाठी माळशिरस राजुरी रस्त्याचा वापर होत आहे. या परिसरात असणा-या रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे पुरंदर तालुक्यातील पर्यटन विकासाची गती मंदावली होती. यामुळे रोजगार निर्मिती सुद्धा कमी झाली होती. मात्र, पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी या भागातील सर्वात महत्त्वाचे हे दोन रस्ते मंजुर केल्यामुळे पुरंदरच्या पूर्व भागातील शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.
माळशिरस गावाला नऊ कोटीचा निधी मंजुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:12 IST