पुणे : सध्या ‘पाऊले लावती परिवर्तनाची वाट’ असे दिवस असताना ‘पाऊले चालती परिवर्तनाची वाट’असे पुस्तक लिहिणे ही चांगली बाब आहे. परंतु हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी वेड्या माणसांची गरज असते. ध्येयवेड्या माणसांची संख्या कमी झाली तर जग नष्ट होईल, असे मत नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी रविवारी व्यक्त केले.मिलिंद देशमुख यांनी लिहिलेल्या ‘पाऊले चालती परिवर्तनाची वाट’ या पुस्तकाचे प्रकाशन व स्नेहमेळावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने एस. एम. जोशी फाउंडेशन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पत्नी शैला दाभोलकर, अंजली देशमुख, जिल्हा कार्यसचिव अॅड. मनीषा महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र कांकरिया उपस्थित होते.पेठे म्हणाले, ‘‘कार्यकर्ता होण्यापेक्षा सवंगडी व्हा. कार्यकर्ते हे नेत्यांचे असतात. श्रीकृष्ण, छत्रपती महाराजदेखील त्यांच्या सहकाऱ्यांना सवंगडी म्हणत असत. एकमेकांचे चांगले सवंगडी बनून चांगल्या परंपरांच्या मदतीने वाईट रूढी, परंपरांचा विनाश केला पाहिजे.’’ (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांमधील संवाद आणि संवादाची पद्धत अतिशय उत्तम पद्धतीने साधता येणे महत्त्वाचे असते. आणि यासाठी व्यक्तीमध्ये विवेकाचा धागा असणे गरजेचे असते. हा धागा वाढवून विणला पाहिजे आणि त्यातून परिवर्तनाचे वस्त्र तयार झाले पाहिजे.- शैला दाभोलकरआत्मविश्वास हवामिलिंद देशमुख म्हणाले, ‘जागतिक विक्रमापेक्षा त्यानंतर विक्रमाचे सादरीकरण जास्त कठीण असते. आपल्या कामाबद्दल जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी असेल तर कोणत्याही असाध्य गोष्टी साध्य करता येतात आणि कामातील आनंदापेक्षा त्यातून मजा घेता आली तर ते काम अधिक सुसह्य होते.’
ध्येयवेड्या माणसांची गरज
By admin | Updated: March 23, 2015 00:59 IST