वाशिम : राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्या होत आहेत, बेरोजगारी वाढली आहे, कोट्यवधी रुपयांचे घोटाळे होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक नेत्यांच्या नव्हे, तर राज्याच्या भवितव्याचा फैसला करणारी असल्याचे मत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी दुपारी जिल्हय़ातील तीनही मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली हो ती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराचा खरपूस समाचार घेत गडकरी म्हणाले की, राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. राज्यात विजेचे मीटर बंद असून, केवळ व्याजाचेच मीटर सुरू आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस जाती-धर्माचे राजकारण करीत आहे. मराठय़ांना आरक्षण देऊन मराठा समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न या पक्षांनी केला असल्याचा आरोप गडकरी यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुरेश लुंगे यांनी केले. संचालन सुभाष नानवटे, आभार प्रदर्शन विनोद जाधव यांनी केले.
मुलीच्या डोळ्यांसमोर आईचा करुण अंत
By admin | Updated: September 30, 2014 01:25 IST