शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

आठवीपासून मुलांमध्ये मोबाईलचं वेड

By admin | Updated: February 14, 2017 01:34 IST

मोबाईलच्या वाढत्या प्रसारामध्ये केवळ तरुणाईच नव्हे, तर आता शालेय विद्यार्थ्यांनाही त्याचा त्रास होऊ लागला आहे. इयत्ता आठवीपासून

प्रशांत ननवरे / बारामतीमोबाईलच्या वाढत्या प्रसारामध्ये केवळ तरुणाईच नव्हे, तर आता शालेय विद्यार्थ्यांनाही त्याचा त्रास होऊ लागला आहे. इयत्ता आठवीपासून महाविद्यालयापर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलच्या अतिवापरातून निर्माण होणाऱ्या समस्या दिसून येत आहेत. सोशल मीडियाचे संदेश सतत तपासणे, सातत्याने मोबाईल वापर, कुटुंबीयांशी संवाद न साधणे, खेळ, मित्रांपासून दूर राहणे, अभ्यास, गुणवत्तेवर परिणाम होणे, विद्यार्थ्यांमध्ये चिडचिड जाणवणे, टोकाची भूमिका घेणे, रागीट स्वभाव, नैराश्य, आॅनलाईन खरेदीचे व्यसन या विद्यार्थ्यांच्या आदी सवयीमुळे पालकवर्ग त्रस्त होऊ लागला आहे. मोबाईल, इंटरनेटचा विद्यार्थी जीवनावर गंभीर परिणाम जाणवू लागला आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांभोवती हा विळखा घट्ट होत आहे. मोबाईल वापर सवयीच्या आधीन झालेले विद्यार्थी पालकांसाठी डोकेदुखी बनले आहेत. मोबाईलच्या अतिवापरापासून विद्यार्थ्यांना दूर करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेण्याची वेळ आली आहे, तर अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असल्याने याबाबत मानसोपचारतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत होत आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक जीवनाची व्याख्या चांगलीच बदलली आहे. त्यामध्ये मोबाईल, इंटरनेटचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटेदेखील आहेत. तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यानंतर हे तोटे आता पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे पालकवर्गाची झोप उडाली आहे. दारू, सिगारेटच्या व्यसनाप्रमाणे इंटरनेट आणि मोबाईलचे व्यसन विद्यार्थ्यांना लागते आहे. येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अपर्णा पवार-घालमे यांनी ‘लोेकमत’शी बोलताना सांगितले, की शालेय, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ‘इंटरनेट अ‍ॅडिक्शन डिसआॅर्डर’ या आजाराचे प्रमाण वाढत आहे. वारंवार मोबाईल पाहणे, सोशल मीडियावर सतत व्यस्त असणे ही लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर गंभीर परिणाम झाला आहे. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरल्याची पालकांची तक्रार आहे. कुटुंबाशी असलेला संवादच हरविल्याचे वास्तव आहे. अनेक आई-वडील, पालक प्रोत्साहन देण्यासाठी स्मार्ट फोन मुलांना देतात. मात्र, दुर्दैवाने याचा गैरवापर होत आहे. पूर्वीच्या काळात मोबाईल अस्तित्वात नव्हते. कोणत्याही कार्यक्रमात त्यामुळे आई-वडिलांबरोबर गेलेली मुले निरीक्षण करीत असत. आपली परंपरा, संस्कृती, नात्यांची व्याख्या या निरीक्षणातून मुलांच्या मनावर नकळत बिंबवली जात असे. मात्र, आता तेच चित्र बदलले आहे. कुटुंबातील प्रत्येक जण मोबाईलमध्ये गुंतला आहे. सार्वजनिकसह कोणत्याही ठिकाणी मोबाईलमध्ये व्यस्त असणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. सर्वत्र हे चित्र प्रकर्षाने जाणवते. मोबाईलमध्ये काही बौद्धिक चालना देणाऱ्या ‘गेम्स’ उपयुक्त आहेत. मात्र, मारामारी, शूटिंग या गेम्सचा ठराविक वापर आवश्यक आहे. अतिवापर चांगला नाही. आपण मुलांना टेक्नोसॅव्ही होण्यापासून कोणी रोखू शक त नाही. मात्र, मुले गरजेपुरता वापर करतील, याची दक्षता घ्यावी. इंटरनेटवर विद्यार्थ्यांचे प्रोजेक्टचेदेखील काम चालते. त्याचा वापर थांबवू शकत नाही. पालकांनी विद्यार्थ्यांना वेळ द्यावा. त्यांच्याशी संवाद साधावा. विद्यार्थ्यांचे चांगल्या बाबींकडे मन वळवावे. भवितव्यासाठी उपयुक्त गोष्टींमध्ये मन गुंतण्यासाठी लक्ष द्यावे. क्रीडा, प्रभावी वैचारिक वाचनाकडे विद्यार्थ्यांना वळवावे.