पुणो : महिला प्रवासी : आमची जागा आहे, उठा ना !
पुरुष प्रवासी : इतर पुरूषांना जागेवरून उठवा मग आम्ही उठू,आम्ही पहिल्या स्टॉपवरून बसलो आहे, तुम्ही आता आलात मग आम्ही उठणार नाही. पुरूषांच्या जागेवरून आधी महिलांना उठवा.
महिला प्रवासी : कंडक्टर काका, त्यांना आमच्या जागेवरुन उठायला सांगा ना.
कंडक्टर : तुम्ही तुमचं बघून घ्या ओ, मला नका सांगू.
अशी वादावादी कानावर पडणो, हे पीएमपीच्या बसमधील प्रवाशांना नित्याचे झाले आहे. बसमध्ये डाव्या बाजूला महिलांसाठी राखीव जागा असूनही पुरुष प्रवासी या जागांवर कब्जा करीत असल्याने महिलांच्या समस्या वाढू लागल्या आहेत. भरगच्च भरलेल्या बसमध्ये टवाळखोर पोरांचे धक्के खात आणि गैरवर्तन करण्या-या पुरुषांचा सामना करीत प्रवास करण्याची वेळ महिलांवर आली आहे. त्यामुळे ‘महिला स्पेशल’ बस देण्याचे प्रशासनाचे पोकळ आश्वासन पूर्ण होणार का, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.
महाविद्यालयीन युवती आणि महिलांना प्रवास करताना येणा-या समस्या जाणून घेण्याकरीता ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. पीएमपी प्रशासनाने केवळ निवडक मार्गावर ‘महिला स्पेशल’ बस सुरु केल्या. दररोज प्रवास करणा-या 1क् लाख प्रवाशांपैकी 3 ते 4 लाख महिला प्रवासी संख्या आहे. परंतु एवढया मोठया संख्येकरीता प्रशासन विशेष सुविधा पुरवू शकत नसल्याने महिलांसोबत गैरवर्तन होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.
स्वारगेट ते हडपसर मार्गावरील बसमध्ये प्रवास करणा-या महिलांनी व्यथा मांडल्या. डावीकडील बाजू महिलांसाठी असते. परंतु तरीही पुरुष या जागांवर अतिक्रमण करतात. त्यामुळे बसमध्ये हक्काची जागा असूनही महिलांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे.
सुखसागरनगर ते क ोथरुड मार्गावरील महिला म्हणाल्या, बसमध्ये जागेसाठी पुरुषांशी भांडण तर होतातच, पण महिला महिलांशी देखील भांडताना दिसतात. अनेक वेळा बसमध्ये कॉलेजच्या मुलांचे ग्रुप असतात. मोठय़ा आवाजात बोलणो, गाणी लावणो, चिडवा-चिडवी करणो असे प्रकार घडतात. याचा महिलांसह सर्व प्रवाशांना त्रस होतो. महिला वाहक बसमध्ये असूनही त्यादेखील महिलांच्या प्रश्नांकडे गांर्भीयाने बघत नाही. याऊलट महिला वाहक अरेरावी करताना दिसतात.
आम्ही दुचाकी का वापरू नये
4पीएमपीमध्ये महिला प्रवाशांना हक्काची जागा मिळेनाशी झाली आहे. लहान मुलांना शाळेत सोडण्यासोबत नोकरीला जाणा:या महिलांची संख्या जास्त आहे. परंतु पुरुषांसोबत दररोज होणारे वाद आणि भांडणो यामुळे महिला वैतागल्या आहेत. त्यामुळे पीएमपीऐवजी आम्ही दुचाकी का वापरू नये, असा सवाल महिला प्रवासी करीत आहेत.
तक्रारींकडे वाहकांचे दुर्लक्ष
4गर्दीत पुरुष डावीकडे उभे राहतात. त्यामुळे आम्हाला उभं राहण्यास त्रस होतो व अशी तक्रार कंडक्टरला केली, तर तेही बहुतेक वेळा दुर्लक्ष करतात. अशी खंतही महिला प्रवाशांनी केली.
महिला स्पेशलची संख्या कमीच
4महिलांच्या बसमधील समस्या सोडवण्यासाठी ‘फक्त महिलांसाठी’ अशी वेगळी बस काढून प्रशासनाने तोडगा काढला.
4ही बस फायदेशीर असून, महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. ‘फक्त महिलांसाठी’ या बस धायरी ते स्वारगेट सारख्या चारही मार्गांवर फार कमी प्रमाणात असल्याने महिला यापासून वंचित राहत आहेत.
प्रथमोपचार पेटय़ा रिकाम्याच
4ज्येष्ठ नागरिकांसाठी बसमध्ये राखीव जागा असूनही त्याच्या जागेवर तरूणवर्ग बसलेला असतो. त्यामुळे महिला प्रवाशांसह ज्येष्ठांनाही उभ्याने प्रवास करावा लागत आहे. किरकोळ अपघात झाल्यास ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने बसमध्ये प्रथमोपचार पेटी बसविण्यात आली आहे. परंतु त्यामध्ये औषधे नसल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आहे.
रात्रीच्या वेळी महिला असुरक्षित
4अनेक महिला रात्री उशिरा बसमधून प्रवास करतात. अंधा:या जागेत असलेले बसथांबे आता महिलांसाठी सुरक्षित राहिलेले नाहीत.
4बससाठी वाट पाहत असताना आजूबाजूच्या परिसरातील मुलांकडून छेड काढण्याचे अनेक प्रकार घडतात. रात्री दारू प्यायलेले लोक प्रवास करतात, याचाही त्रस होतो.
4अनेकदा बस वाहकदेखील दारू प्यायलेले असतात. यामुळे रात्री प्रवास करताना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.