शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

विद्यार्थ्यांचेही साहित्य संमेलन

By admin | Updated: January 23, 2015 23:58 IST

विद्यार्थ्यांमध्ये साहित्य संस्कृती रुजावी, तरुण लेखकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचा साहित्य मेळा भरविला जाणार आहे.

राजानंद मोरे- पुणेविद्यार्थ्यांमध्ये साहित्य संस्कृती रुजावी, तरुण लेखकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचा साहित्य मेळा भरविला जाणार आहे. विद्यापीठामार्फत पुढील महिन्यात तीन दिवसीय राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन भरविण्याचे नियोजित असून, त्याची तयारीही सुरू झाली आहे. राज्यात पहिल्यांदाच खास विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान विद्यापीठाला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसेच अन्य साहित्य संमेलनांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही. वास्तविक अनेक विद्यार्थ्यांना साहित्य लेखन तसेच वाचनाची आवड असते. अनेक वेळा केवळ महाविद्यालय किंवा विद्यापीठस्तरीय नियतकालिकांपर्यंत त्यांची प्रतिभा मर्यादित राहते. एकीकडे तरुणांचा साहित्याकडील ओढा कमी होत चालल्याची ओरड अनेक जण करीत असतात; मात्र त्यांच्यात साहित्यविषयक गोडी निर्माण होण्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काही साहित्य संस्थांच्या मदतीने खास विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन भरविण्याचे नियोजन सुरू केले आहे. फेबु्रवारी महिन्यात तीन दिवस हे संमेलन घेण्यात येणार आहे. राज्यात पहिल्यांदाच फक्त विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून साहित्य संमेलन भरविले जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.सुमारे २०० विद्यार्थ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था विद्यापीठामार्फत केले जाईल. तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि अन्य विद्यापीठांतील विद्यार्थ्यांसाठी संमेलन खुले असणार आहे. साहित्य क्षेत्रातील तरुण लेखक, कवी यांच्यासह साहित्यात मोठे योगदान दिलेल्या साहित्यिकांना या संमेलनात निमंत्रित केले जाणार आहे. तीन दिवस विद्यार्थ्यांसाठी भरगच्च कार्यक्रमांबरोबरच त्यांना खुले व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरेल. संमेलनाची प्राथमिक तयारी सुरू झाली असून, लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल.(प्रतिनिधी)विद्यार्थी साहित्य संमेलन भरविण्याबाबत महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्रस्ताव मिळाला आहे. खास विद्यार्थ्यांसाठी संमेलन भरविल्यास त्याचा विद्यार्थ्यांवर चांगला परिणाम होईल. या प्रस्तावावर प्राथमिक स्तरावर विचार सुरू आहे. याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.- डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरूसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ