शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

‘माहेर’ने राबविला जलपुनर्भरण उपक्रम

By admin | Updated: July 14, 2016 00:41 IST

मागील काही महिन्यांत शहर व तालुक्याने पाणीटंचाईची परिस्थिती अनुभवली. टंचाईच्या काळातच खरे पाण्याचे महत्त्व कळते.

शिरूर : मागील काही महिन्यांत शहर व तालुक्याने पाणीटंचाईची परिस्थिती अनुभवली. टंचाईच्या काळातच खरे पाण्याचे महत्त्व कळते. मात्र, याची कायमस्वरूपी जाणीव ठेवणे गरजेचे आहे. याची खऱ्या अर्थाने येथील अनाथ मुलांच्या ‘माहेर’ या संस्थेने जाणीव ठेवली व आपल्या इमारतीत जलपुनर्भरण उपक्रम राबविला. असा उपक्रम प्रत्येकाने राबविला, तर पाण्याची समस्या कमी होऊ शकेल.पाणी उपलब्ध असले की मुबलक पाण्याचा वापर करायचा. ही नागरिकांची सवय बनली आहे. झाडांच्या कत्तलीमुळे जंगले नष्ट होत चालली आहे. वृक्षलागवडीचे महत्त्व अद्याप नागरिकांना पटले नाही. अशामुळे पर्जन्यमानाची अनिश्चितता अनुभवयास मिळत आहे. मागील वर्षी (२०१५) कमी पाऊस झाला. परिणामी, शहर व तालुक्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. शहरात मार्च महिन्यापासून पाणीटंचाई सुरू झाली. जूनअखेर बंधारा कोरडा पडला. अशाप्रकारची टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पावसाचा प्रत्येक थेंब उपयोगात आणणे गरजेचे आहे.घराच्या छतावरील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जाते. हे पाणी वाया न जाता त्याचा उपयोग व्हावा, याबाबत अनेकदा आवाहन करण्यात येते. शहरात अथवा तालुक्यात क्वचितच असा उपयोग करण्यात आला असावा. शिरूरपासून एक किलोमीटर अंतरावर रामलिंग रस्त्यावर अनाथांची ‘माहेर’ संस्था आहे. दोन मजली इमारतीत ३० मुले येथे राहतात. या संस्थेच्या संस्थापिका ल्युसी कुरियन यांच्या संकल्पनेतून या इमारतीच्या छतावरील पाणी पाईपद्वारे खाली घेण्यात आले. विंधनविहिरीच्या पाईपच्या बाजूला खड्डा घेऊन तेथे हे पाणी सोडण्याचा उपक्रम राबविण्यात आला. पाईपाच्या बाजूला खड्ड्यात पाणी शुद्धीकरण करणासाठी खाली प्रथम वाळू, त्यावर मोठी वाळू, त्याच्यावर खडी (४ एमएम.) त्यावर विटाचे तुकडे टाकण्यात आले. छतावरील पाणी पाईपद्वारे येथे पडते. विंधनविहिरीच्या पाईपला छोटे छिद्रे पाडण्यात आले आहे. त्याबाजूला जाळी लावण्यात आली आहे. छतावरील पाणी शुद्ध होऊन या पाईपमध्ये जाते. अशा पद्धतीने जलपुनर्भरणाचा उपक्रम ‘माहेर’ने राबविला आहे. या सिझनमधील झालेल्या पावसाच्या पाण्याचे ‘माहेर’ने जलपुनर्भरण उपक्रमाद्वारे चांगले नियोजन केल्याने पाण्याची पातळी वाढली. (वार्ताहर)