महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : वडगावशेरीत घड्याळाचा ‘गजर’,जगदीश मुळीक यांना धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 08:12 PM2019-10-24T20:12:08+5:302019-10-24T20:17:52+5:30

Pune Elecion Result 2019 : वडगावशेरीत मतदारांकडून पुन्हा घड्याळाला पसंती.. 

Maharashtra Election Result 2019 : The NCP Sunil Tingare beat BJP Jagdish Mulik in Vadgaon | महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : वडगावशेरीत घड्याळाचा ‘गजर’,जगदीश मुळीक यांना धक्का 

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : वडगावशेरीत घड्याळाचा ‘गजर’,जगदीश मुळीक यांना धक्का 

googlenewsNext
ठळक मुद्देसुनील टिंगरे  यांना ९७,७०० तर; जगदीश मुळीक यांना ९२,७२७ मतेपहिल्या आठ फे-यांमध्ये सुनील टिंगरे यांनी १६ हजार ५७९ आघाडी घेतली होतीवंचित,एमएमआय ‘फॅक्टर’ चालला नाहीसुनील टिंगरे यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली

पुणे: वडगावशेरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी अटीतटीच्या लढतीत अखेर विजयश्री खेचून आणली.पहिल्या फेरीपासून घेतलेली मतांची आघाडी टिंगरे यांनी शेवटच्या फेरी अखेरपर्यंत कायम ठेवली. टिंगरे यांना ९७ हजार ७०० मते तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जगदीश मुळीक यांना ९२ हजार ७२७ मते मिळाली. त्यामुळे टिंगरे यांनी ४ हजार ९७५ मतांनी विजय मिळवत वडगावशेरीत घड्याळाचा ''गजर'' केला.
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघापैकी वडगावशेरी विधानसभा मतदार संघात २ लाख १४ हजार मतदान झाले होते.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मतमोजणीसाठी २२ फे-यांचे नियोजन केले होते. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली आणि दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास मतमोजणी पूर्ण झाली.पहिल्या फेरीपासून आठव्या फेरीपर्यंत टिंगरे यांनी मुळीक यांच्यापेक्षा प्रत्येक फेरीत नेहमीच अधिक मते घेतली.या आठही फे-यांमध्ये टिंगरे यांनी मुळीक यांच्यापेक्षा १६ हजार मतांची आघाडी घतली होती. मात्र, नवव्या फेरीत मुळीक यांनी टिंगरे यांच्यापेक्षा १ हजार ५४८ मते अधिक घेतली. तसेच मुळीक यांनी अकराव्या १ हजार ४४६ मते ,बाराव्या फेरीत १ हजार ९०२ , तेराव्या फेरीत १ हजार ९२२ ,चौदाव्या फेरीत १ हजार ३०१, सतराव्या फेरीत ८९५ मते , एकोणिसाव्या फेरीत २ हजार २४३ मते , विसाव्या फेरीत २ हजार १९७ आणि एकविसाव्या फेरीत २ हजार ६५ अधिक मते घेतली.त्यामुळे मुळीक यांनी टिंगरे यांची १६ हजार मतांची आघाडी २१ साव्या फेरीपर्यंत कमी करत आणली. परंतु, शेवटपर्यंत मुळीक यांना टिंगरे यांना मागे टाकला आले नाही.अखेर बारावीसाव्या फेरीत अंतिम पाच पेट्यांमधील मतांची मोजणी झाल्यावर टिंगरे यांचा विजय झाल्याचे स्पष्ट झाले.
---------------------------
वडगावशेरीतील उमेदवारांना मिळालेली मते 
उमेदवाराचे नाव                          मिळालेली मते 
सुनील टिंगरे (राष्ट्रवादी)                 ९७,७००
जगदीश मुळीक (बीजेपी)                ९२,७२५
प्रविण गायकवाड (वंबआ)              १०,२९८
डॅनिअल लांडगे (एमआयएम )        ७,७०२
राजेश बेंगळे                                  १६५३
गणेश ढमाले                                  ९०८
सविता औटी                                  २९८
शशिकांत राऊत                             २०४
प्रकाश पारखे                               १९८
प्रसाद कोरडे                                १७४
जितेंद्र भोसले                             १४८
विठ्ठल गुल्हाणे                           १७७
    नोटा                                   २,४१७
-----------------

पहिल्या आठ फे-यांमध्ये सुनील टिंगरे यांनी १६ हजार ५७९ आघाडी घेतली होती.त्यामुळे जगदीश मुळीक यांना १६ हजारांची आघाडी मागे टाकणे अवघड दिसत होते.त्यामुळे सुनील टिंगरे विजय होतील, असे चित्र आठव्या फेरीपासूनच निर्माण झाले होते.

*  वडगावशेरीतील निकालाची वैशिष्टे
 सुनील टिंगरे यांना ४५.२१ टक्के मते 
 मुळीक यांना ४३.२१ टक्के मते 
 वंचित,एमएमआय ‘फॅक्टर’ चालला नाही
सुनील टिंगरे यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली
वडगावशेरीत मतदारांकडून पुन्हा घड्याळाला पसंती 

Web Title: Maharashtra Election Result 2019 : The NCP Sunil Tingare beat BJP Jagdish Mulik in Vadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.