शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कोथरूडमध्ये भाजपाला ‘दस’ नंबरी यश

By admin | Updated: February 24, 2017 03:35 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह शिवसेना व मनसेला काट्याची टक्कर देत कोथरूडमध्ये भाजपाला

पुणे : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह शिवसेना व मनसेला काट्याची टक्कर देत कोथरूडमध्ये भाजपाला ‘दस’ नंबरी यश मिळाले. दहा प्रभागामध्ये भाजपाच्या उमेदवारांनी दोन विद्यमान नगरसेवकांना चीत करीत चारही जागांवर आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले. प्रभाग क्र. ११ मध्ये आघाडीला भाजपाने काहीसा छेद दिला. राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविकेला पराभवाचा धक्का देत एका जागेवर भाजपाने आपले ‘खाते’ उघडले, तर प्रभाग क्र. १२ मध्ये भाजपाने शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. केवळ एका जागेवर आपला हक्काचा ‘गड’ राखण्यात शिवसेना यशस्वी ठरली. प्रभाग क्र. १०, ११ आणि १२ प्रभागांच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. भाजपा आणि शिवसेनेच्या १० या पारंपरिक प्रभागामध्ये गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपले पाय रोवले होते. मात्र, मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून भाजपाच्या चारही उमेदवारांनी आघाडी घेतली. प्रभाग अ या मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव असलेल्या गटात भाजपाचे किरण दगडे पाटील, विद्यमान नगरसेवक व सभागृह नेते शंकर केमसे आणि मनसेचे किशोर शिंदे यांच्यात तिरंगी लढत होती. मात्र, शिंदे मतांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर गेले आणि दगडे पाटील व केमसे यांच्यात दुहेरी लढत झाली. केमसे यांना पराभवाची धूळ चारून ७२४१ मतांची आघाडी घेत दगडे पाटील यांनी विजयाची मोहोर उमटवली. दगडे पाटील यांना १६९८६, केमसे यांना ९७४५ तर किशोर शिंदे यांना ६२११ मते पडली. ब गटात मनसेच्या नगरसेवक जयश्री मारणे, मनसेनंतर भाजपा आणि तिकीट न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केलेले राजेंद्र गोरडे यांच्या पत्नी अंजली गोरडे, भाजपाच्या श्रद्धा प्रभुणे व शिवसेनेच्या छाया भिकुले यांच्यात लढत होती. प्रभुणे यांनी एकहाती वर्चस्व मिळवित १०,८५४ इतक्या फरकाने मारणे आणि गोरडे यांचा पराभव केला. क मध्येदेखील अल्पना वरपे यांनी १७,५६८ इतक्या मताधिक्याने राष्ट्रवादीच्या साधना डाकले यांच्यासह मनसेच्या पुष्पा कनोजिया, शिवसेनेचे पूर्वीचे नगरसेवक अंकुश तिडके यांच्या पत्नी साधना भिकुले यांना पराभूत केले. ड गटात राष्ट्रवादीच्या कुणाल वेढे व भाजपाचे दिलीप वेढे पाटील यांच्यात कडवी झुंज होईल, असे वाटत होते, मात्र पहिल्या फेरीपासून ते सहाव्या फेरीपर्यंत भाजपाचीच आघाडी राहिली.प्रभाग क्र. ११ मध्ये गेल्या दहा ते बारा वर्षांमध्ये राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांनी स्थान बळकट केले आहे. तरीही शिवसेना-भाजपा आणि मनसेने तिथे शिरकाव करण्याचे धाडस केले. अ,ब,क आणि ड या गटात आघाडीचे दीपक मानकर, अश्विनी जाधव (राष्ट्रवादी) वैशाली मराठे व चंदू कदम या पॅनेलच्या विरोधात भाजपाने संतोष अमराळे, छाया मारणे, मनीषा बुटाला आणि दिलीप उंबरकर हे उमेदवार उभे केले होते. भाजपाला चारही जागेवर विजय मिळविता आला नसला, तरी काट्याची टक्कर देत ब गटात अश्विनी जाधव यांचा भाजपाच्या छाया मारणे यांनी १२८९ मतांनी पराभव करून विजयश्री खेचून आणली. दीपक मानकर १७३७०, वैशाली मराठे १४१८९ व चंदू कदम १८३२४ मतांनी विजयी झाले. प्रभाग क्र. १२ (डहाणूकर कॉलनी-मयूर कॉलनी) हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. युती तुटल्यामुळे भाजपा व सेनेने या भागात स्वतंत्र उमेदवार उभे केले. प्रभागातील चारही जागांवर भाजपा, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आघाडीमध्ये लढत होती. चारही गटांत भाजपा आणि शिवसेनेने कडवी झुंज दिली. अ मध्ये भाजपाच्या हर्षाली माथवड आणि सेनेच्या शांता भेलके यांच्यातच, ब मध्ये वासंती जाधव (भाजपा) व कांचन कुंबरे (शिवसेना), क गटात मुरलीधर मोहोळ (भाजपा) आणि माजी नगरसेवक शाम देशपांडे, तर ड गटात मिहिर प्रभुदेसाई (भाजपा) व पृथ्वीराज सुतार ( शिवसेना) यांच्यात तगडी लढत झाली. अ, ब, क गटातील जागांवर तिन्ही भाजपाच्या उमेदवारांनी नाव कोरले. ड मध्ये प्रभुदेसाई यांनी सुतार यांना तिसऱ्या व सहाव्या फेरीदरम्यान मागे टाकले. शिवसेनेच्या हातून ही जागा पण जाते की काय, असे वाटत होते, मात्र १०५२इतक्या कमी फरकाने सुतार निवडून आले. माथवड यांना १९६५३, जाधव २३४३४, मुरलीधर मोहोळ २०९५५ आणि पृथ्वीराज सुतार यांना १८७३५ मते पडली.