अमोल जायभाये, पिंपरीतरुणांमध्ये हौसेखातर धूम्रपान करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांतील तरुण-तरुणी या व्यसनाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षिले जात आहेत. धूम्रपान करणे हे प्रतिष्ठेचे मानले जात आहे. त्यामुळे असाध्य रोगाला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे.धूम्रपानाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासकीय पातळीवरून त्यांवर अनेक कायदे केले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. त्यावर कारवाई होत नसल्याने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. शाळा-महाविद्यालयांच्या बाहेर २०० मीटर अंतरापर्यंत सिगारेटची विक्री करण्यास बंदी आहे. त्यावर कारवाई करण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना आहेत. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. १८ वर्षांखालील मुलांना सिगारेटची विक्री करणे गुन्हा आहे. मात्र, याची कोणत्याच प्रकारे अंमलबजावणी होताना दिसत नाही. तर शहरामध्ये शाळा-महाविद्यालयांच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर पानटपऱ्या असल्याचे दिसून येते. त्यांच्यावर कारवाईसंदर्भात शाळेतील मुख्याध्यापकही उदासीन असतात. शाळेतील तरुण-तरुणीसार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. सिगारेटची विक्री कमी होण्यासाठी राज्य शासनाने खुल्या सिगारेटची विक्री करण्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव आणला होता.मात्र, तो प्रस्ताव तसाच गुंडाळून ठेवला आहे. सिगारेटची मोठी विक्री दररोज होत असते. जास्तीत जास्त धूम्रपान केल्यामुळे मोठ्या प्रमाणात आजारांना बळी पडावे लागते. धूम्रपानामुळे कर्करोगाचा धोका, तसेच हृदयविकाराचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे बळी जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.
हौसेखातर असाध्य आजाराला निमंत्रण
By admin | Updated: March 11, 2015 00:59 IST