देऊळगावराजे : आलेगाव (ता. दौंड) परिसरातील भीमा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या ५ फायबर आणि दोन अन्य बोटी जिलेटिनच्या स्फोटाने उडवल्या. ही कारवाई प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार उत्तम दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने केली असल्याची माहिती नायब तहसीलदार सुनील शेळके यांनी दिली. भीमा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळूउपसा सुरूअसल्याची माहिती महसूल यंत्रणेला मिळाली. त्यानुसार नदीपात्रात बेकायदेशीर वाळूउपसा बोटीच्या साह्याने सुरूहोता. महसूल पथकाला पाहताच वाळू चोरटे पसार झाले. मात्र, बोटी महसूल कर्मचाऱ्यांच्या हाती लागल्या. या बोटी जिलेटिनच्या साह्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या. (वार्ताहर)
भीमापात्रात अवैध वाळूउपसा सुरूच
By admin | Updated: August 21, 2015 02:38 IST