शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
7
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
8
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
9
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
10
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
11
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
12
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
13
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
14
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
15
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
16
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
18
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
19
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
20
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे

कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ

By admin | Updated: October 28, 2015 01:38 IST

आयटी हब ही पुण्याची मागील काही वर्षांपासूनची ओळख. परंतु तंत्रज्ञानाचे जसे फायदे होतात तसेच तोटेही. कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम हे त्याचेच एक उदाहरण.

पुणे : आयटी हब ही पुण्याची मागील काही वर्षांपासूनची ओळख. परंतु तंत्रज्ञानाचे जसे फायदे होतात तसेच तोटेही. कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम हे त्याचेच एक उदाहरण. पुण्यातील नागरिकांनाही आता याच त्रासाला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मागील काही वर्षांपासून संगणकाचा वापर सर्वच क्षेत्रांत वेगाने वाढत आहे. कित्येक तास सलग संगणकासमोर किंवा मोबाईलच्या स्क्रीनसमोर असणाऱ्या तंत्रज्ञान-सॅव्ही तरुणाईला या आजाराने ग्रासले असून, पुसट दृष्टी, कोरडेपणा आणि प्रतिमांवर दृष्टी केंद्रित करण्यात येणाऱ्या अडचणी अशा तक्रारींमध्ये आता वाढ झाल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.आपल्या मेंदूला प्राप्त होणाऱ्या माहितीपैकी ८० टक्के माहिती ही डोळ्यांमार्फत मिळत असते. त्यामुळे डोळ्यांची निगा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमबद्दल माहिती देताना डॉ. संजय सावरकर म्हणाले, की कॉम्प्युटर स्क्रीनकडे दीर्घकाळ बघितल्यामुळे डोळ्यांना कायमस्वरूपी इजा होते, असे अद्याप विज्ञानाने सिद्ध झालेले नाही. स्क्रीनमधून बाहेर पडणाऱ्या तीक्ष्ण प्रकाशामुळे (ग्लेअर) डोळ्यांवर ताण येतो. संगणक किंवा अन्य प्रकारच्या स्क्रीनवर दीर्घकाळ काम करणाऱ्या व्यक्तींची डोळ्याची उघडझाप पुरेशा प्रमाणात होत नाही. त्यामुळे डोळे कोरडे पडतात. प्रत्येक वेळा डोळे बंद करताना डोळ्यावर अश्रूंचा पातळ थर पसरवला जात असतो. संगणकावर नजर स्थिर राहत असल्यामुळे अश्रूंचा थर पसरवण्याची क्रिया पुरेशी होत नाही आणि डोळे कोरडे पडतात.डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण सामान्य स्थितीत एका मिनिटाला साधारण २२ इतके असते. पुस्तक वाचताना हे प्रमाण मिनिटाला दहा, तर संगणकावर काम करताना मिनिटाला सात वेळा एवढे कमी होते. त्याचबरोबर वातानुकूलन यंत्रणेखाली सतत बसल्यामुळे, कार्यालयातील धुळीमुळेही डोळ्यांवर परिणाम होतो. यामध्ये डोळ्यांची आग होणे, पाणी येणे, डोळे थकणे, डोळे कोरडे पडणे, चोळावेसे वाटणे अशी लक्षणे आढळल्यास तसेच संगणकावर काम करताना स्क्रीन आणि डोळ्यांतील अंतर तसेच बसण्याच्या पद्धतीबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. सावरकर यांनी सांगितले.त्यामुळे डोळ्यांचा कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच काही सोेपे उपाय केल्यासही या समस्येवर काहीसा आराम मिळू शकतो. यात डोळे ठराविक काळाने गार पाण्याने धुणे, ठराविक काळाने स्क्रीनवरून नजर बाजूला घेऊन इतर ठिकाणी शक्यतो नैसर्गिक गोष्टींकडे पाहणे, हे उपाय करावे. (प्रतिनिधी)