शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

नवीन शैक्षणिक धोरणाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: February 16, 2017 03:27 IST

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल केवळ चर्चा केली जाते. मात्र, त्याबाबत ठोस पावले उचलली जात नाहीत, अशी खंत माजी केंद्रीय

पुणे : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल केवळ चर्चा केली जाते. मात्र, त्याबाबत ठोस पावले उचलली जात नाहीत, अशी खंत माजी केंद्रीय गृह व न्याय सचिव डॉ. माधव गोडबोले यांनी व्यक्त केली. तसेच शिक्षणाचे बाजारीकरण झाले असून भारतात परदेशी विद्यापीठांना येण्याची परवानगी दिल्यास खासगी शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणात सुधारतील, असेही त्यांनी सांगितले.मेहता पब्लिशिंग प्रकाशित डॉ. वि. मा. बाचाललिखित व डॉ. राजा दीक्षित संपादित ‘वाटचाल फर्ग्युसनची’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी गोडबोले बोलत होते. माजी केंद्रीय सचिव शीला भिडे, सुनील मेहता, शरद गोगटे, डॉ. राजा दीक्षित, दीपक बाचल, जोतू उनकिले आदी उपस्थित होते.गोडबोले म्हणाले, ‘‘खासगी शिक्षण संस्थांकडे उत्तम पायाभूत सुविधा आहेत. परंतु, विद्यार्थ्याच्या जडणघडणीसाठी आवश्यक असलेले मूल्याधिष्ठित शिक्षण काही खासगी संस्थांकडून दिले जात नाही. जागतिकीकरणानंतर सर्व संबंध बदलले आहेत. हिंदी, इंग्रजी, मराठी असा वाद राहिला नाही. स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी माध्यम महत्त्वाचे ठरत आहे.’ फर्ग्युसन महाविद्यालयाविषयी असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन महाविद्यालयात होत नाही तर गोखले इन्स्टिट्यूटमध्ये घ्यावे लागत आहे, ही फार मोठी शोकांतिका असल्याचेही त्यांनी नमूद केले. राजा दीक्षित, शीला भिडे आदींनी मनोगत व्यक्त केले.