शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

...आता सगळं नशिबाच्याच हवाल्यावर

By admin | Updated: September 4, 2015 02:02 IST

दुष्काळ आमच्या पाचवीलाच पूजलेला आहे... माणसं कशीही जगतील... पण मुक्या जनावरांचं काय...त्यांना ना चारा ना पाणी...जिवापाड संभाळेलेल्या जनावरांची हाडं वर आली

चंद्रकांत साळुंके, काऱ्हाटीदुष्काळ आमच्या पाचवीलाच पूजलेला आहे... माणसं कशीही जगतील... पण मुक्या जनावरांचं काय...त्यांना ना चारा ना पाणी...जिवापाड संभाळेलेल्या जनावरांची हाडं वर आली... त्यामुळे चारा डेपो सुरू करा म्हणून सरकारी अधिकाऱ्यांना रोज विनवण्या केल्या... आंदोलने केली मात्र त्यांच्या कानापर्यंत आवाजच पोहोचेना... आता सगळं नशिबाच्याच हवाल्यावर सोडावं लागणार... अशी व्यथा बारामतीच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांनी मांडली. सलग चार वर्षांपासून पावसाच्या कमतरतेने खरीप हंगाम वाया गेला आहे. जनावरांच्या चाऱ्याची पिके घेतली नसल्याने शेतकऱ्यांना जिवापाड संभाळलेली जनावरे कसे जगवायची, या विचारात शेतकरी पडला आहे. काऱ्हाटी, बाबुर्डी, पानसरेवाडी, माळवाडी, फोंडवाडा, जळगाव सुपे, जळगाव क .प. देऊळगाव रसाळ आदी भागांत भीषण पाणीटंचाई आहे. (वार्ताहर)पावसाचे ३ महिने उलटले, तरी पाऊस पडेना; बहुतांश विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. असणारे पाणी क्षारयुक्त असल्याने नाइलाजास्तव जनावरांना पिण्याचे पाणी म्हणून पाजावे लागत आहे. हंगामातील बाजरी, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग, कांदा पिके वाया गेली आहेत. आजअखेर जनावरांना चारा विकत आणावा लागत आहे. साठवलेला चारा संपल्याने सर्व काही नशिबाच्या हवाल्यावर असल्याचे शेतकरी बोलत आहेत. निदान जनावरांचा चारा प्रश्न सुटला असता, तरी शेतकरी हतबल झाला नसता. शेती ओस पडली आहे. पिण्यास पाणी नाही. शेतीवर कर्ज काढले आहे. परतफेड कशी करायची. गोठ्यातील जनावरे उपाशीपोटी कशी ठेवायची. त्यांना पोटभर चारा कसा द्यायचा, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे असल्याचे शेतकरी शिवाजीराव वाबळे यांनी सांगितले.आवाक्याबाहेरील दराने शेतकरी हतबल बागायती भागातून जिरायती भागातील शेतकरी जनावरांचा चारा विकत घेत आहेत. मात्र, ऊस उत्पादक उसाचे दर चढ्या भावाने लावत आहेत. एका गुंठ्याला पाच ते सहा हजार रुपये बाजारभावाने ऊस विक्री सुरू आहे. या आवाक्याबाहेरील दराने जिरायती भागातील शेतकरी हतबल झाला आहे. जनावरांना चारा कसा द्यायचा. पैसे कोठुन आणायचे, अशा अनेक प्रश्नांनी शेतकरी अडचणीत सापडला आहे.