पुणे : ‘प्रेम’ या शब्दातं किती मिठास आहे, हे प्रेमात पडलेला व्यक्तीच सांगू शकतो. प्रेम हा एक शब्द नाही तर जाणीव, नातं आणि भावना आहे तो किंवा ती आपलं असण्याची. ते एकमेकांचे होऊन जाणं..दुरावा..पुन्हा भेटणं...सारे भावनांचे अस्फुट हुंकार केवळ प्रेमातच अनुभवायला मिळतात.....प्रेमात पडल्यानंतरच ‘कविते’ची बीज मनात अंकुरायला लागतात...हे विशेष सांगायला नको! काहीशा ...तू माझा असणं किती छान आहे,नाहीतर हे जग नुसतंचमाणसांचं रान आहेकिंवा तू बोलत नसतेस ना माझ्याशी तेव्हा जाणवतो मला आपल्यातलाअबोल संवाद...अशाच अबोल्याला साद घालणा-या चारोळ्या आणि कवितांमधून प्रेमाची अनेक रूप रसिकांसमोर उलगडत गेली आणि प्रत्येकजण पुन्हा नव्याने ‘प्रेमात’ पडला. निमित्त होते, ’मी तुझाच’ या स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त रंगलेल्या कार्यक्रमाचे. प्रसिद्ध चारोळीकार चंद्रशेखर गोखले, गायिका-अभिनेत्री उमा गोखले यांच्या साथीनं कार्यक्रम बहरला . गोखले यांच्या चारोळ्या तसेच निवड ललित कथा, उमा गोखले यांची गाणी आणि अभिजित थिटे यांच्या कवितांसह गप्पा, गोष्टी अशा स्वरूपातून हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळीवर अनेकांची प्रेमं फुलली... गीतांच्या सादरीकरणाबरोबर चारोळीकरांच्या कथेचे अभिवाचनही उमा गोखले यांनी केले. (प्रतिनिधी)
प्रेमाचे रूप उलगडणारा ‘मी तुझाच’
By admin | Updated: February 15, 2016 01:28 IST