हडपसर : लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा व सुविधा देण्याच्या दिशेने लक्षणीय पाऊल टाकत सिरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाने वेल्फेअर मेडिकल फाउंडेशन ट्रस्टच्या सहयोगाने हडपसरमध्ये विलू पूनावाला मेमोरियल हॉस्पिटलचे सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले.या रुग्णालयाचे बांधकाम, सुसज्जता आणि कार्यान्वित करण्याची जबाबदारी वेल्फेअर मेडिकल फाउंडेशनने पार पाडली, तर त्यास सिरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाने पूर्णत: आर्थिक व तार्किक सहकार्य केले आहे. या वेळी डॉ. सायरस पूनावाला, अडर पूनावाला आणि नताशा पूनावाला, तसेच सचिन तेंडुलकर आणि वेल्फेअर मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त उपस्थित होते. नताशा पूनावाला म्हणाल्या, ‘‘जनरल वॉर्डमधील अंदाजे एक तृतीयांश बेड्स राखून ठेवून, निम्न सामाजिक-आर्थिक वर्गांना सेवा देण्याचा रुग्णालयाचा हेतू आहे. समाजासाठी आरोग्यसेवांचा खर्च किमान ५० टक्के कमी करण्याचा रुग्णालयाचा प्रयत्न आहे.’’
परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा
By admin | Updated: December 22, 2016 02:25 IST