शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

‘आरोग्य कवचा’ला उत्पन्नमर्यादेचा अडसर, योजना आकर्षक, पण अंमलबजावणीत मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 03:06 IST

देशातील ५० कोटी गरीब लोकांच्या आरोग्याला सुरक्षा कवच देणारी योजना आकर्षक वाटत असली तरी अंमलबजावणी करणे कठीण आहे. योजनेचा खर्च अवाढव्य असल्याने त्याच्या फायद्यासाठी कुटुंबाची उत्पन्नमर्यादा खूप कमी ठेवली जाऊ शकते. तसे झाल्यास अत्यंत कमी लोकांना योजनेचा प्रत्यक्ष फायदा मिळेल.

पुणे  - देशातील ५० कोटी गरीब लोकांच्या आरोग्याला सुरक्षा कवच देणारी योजना आकर्षक वाटत असली तरी अंमलबजावणी करणे कठीण आहे. योजनेचा खर्च अवाढव्य असल्याने त्याच्या फायद्यासाठी कुटुंबाची उत्पन्नमर्यादा खूप कमी ठेवली जाऊ शकते. तसे झाल्यास अत्यंत कमी लोकांना योजनेचा प्रत्यक्ष फायदा मिळेल. त्यामुळे एक तर उत्पन्नमर्यादा ३ ते ५ लाखापर्यंत वाढविणे किंवा मर्यादा न ठेवता उत्पन्न गट निश्चित केल्यास त्याची व्यापकता वाढेल, अशी अपेक्षा आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशातील १० कोटी गरीब कुटुंबासाठी राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत ५० कोटी लोकांना प्रत्येकी दरवर्षी पाच लाख रुपयांचा विमा सुरक्षा कवच दिला जाणार आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असल्याचे जेटली यांनी जाहीर केले आहे. पण या योजनेचा तपशील अद्याप जाहीर करण्यात न आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. ही योजना नेमक्या कोणत्या कुटुंबांना लागू होईल, त्याची उत्पन्न मर्यादा किती असेल, कोणते आजार, रुग्णालये, विमा कंपन्या यांमध्ये समाविष्ट असतील, हे अद्याप उघड झालेले नाही. मात्र, १० कोटी कुटुंबांचा उल्लेख करण्यात आल्याने केवळ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबच याचा लाभ घेऊ शकतील, असे दिसते.खासगी रुग्णालयाचाखर्च वाढल्याने होतेय कर्जइंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनीही उत्पन्नमर्यादा वाढविणे गरजेचे असल्याचे म्हटले़अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना विविध आजारांचा खर्च पेलवत नाही. यासाठी त्यांना आपापल्यापरीने कर्ज काढावेच लागते.खासगी रुग्णालयांचा खर्च खूप वाढला आहे. त्यामुळे योजनेसाठी उत्पन्नमर्यादा ३ ते ५ लाखांंपर्यंत करणे गरजेचे आहे.अंमलबजावणी आव्हानात्मकयोजनेअंतर्गत बहुतेक मोठ्या आजारांवरील उपचार, शस्त्रक्रिया होऊ शकतात. त्याचा अनेकांना फायदा होईल.पण योजनेमध्ये ५० कोटी लोकांना फायदा होणार असल्याचे म्हटले असून त्यासाठी तब्बल ५० लाख कोटी रुपये रक्कम राखून ठेवणे आवश्यक आहे. पण अर्थसंकल्पात तरतूद केलेली दिसत नाही.एवढे पैसे कुठून आणणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे ही केवळ पोकळ घोषणा वाटते. अंमलबजावणी करणे कठीण होईल, अशी शक्यता डॉ. भोंडवे यांनी व्यक्त केली.आज निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांनाहीअनेक दुर्धर किंवा इतर आजारांचे उपचार, शस्त्रक्रियांचा खर्च परवडत नाहीत. त्यांना कर्ज काढून उपचार घ्यावे लागतात. या लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे खालची उत्पन्नमर्यादा न ठेवता उत्पन्न गट निश्चित करायला हवेत.रुग्णालयांचाच फायदाआरोग्य योजनेचा सर्वाधिक फायदा खासगी रुग्णालयांनाच होणार आहे. राजीव गांधी आरोग्यदायी योजना किंवा इतर आरोग्यविषयक योजनांमध्ये अनेक रुग्णालयांकडून पैसे लाटले जातात.या योजनेतही बोगस, अनावश्यक शस्त्रक्रिया, रुग्णालयांमध्ये अ‍ॅडमिट करण्याचे प्रकार होऊ शकतात, अशी भीती डॉ. अविनाश भोंडवे व सुहास कोल्हेकर यांनी व्यक्त केली.योजनेचा लाभ कोणाला द्यायचा यापेक्षा कोणाला देऊ नये, हे निश्चित करायला हवे. दहा कोटी कुटुंब म्हणजे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांनाच या योजनेचा फायदा मिळू शकतो.- डॉ. सुहास कोल्हेकरजनआरोग्य अभियानचे राज्य सहसमन्वयकमधुमेह,रक्तदाब या आजारांचे काय?मागील काही वर्षांत बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यविषयक चित्र बदलले आहे. हृदयाशी संबंधित आजार वाढण्याबरोबरच मधुमेह, रक्तदाब, किडनी, श्वसनासंबंधीचे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. मध्यमवर्गीयांमध्ये हे प्रमाण अधिक दिसून येते. पण यापैकी बरेचसे आजार विमा संरक्षणाखाली येत नाहीत. काही आजारांच्या औषधांचा खर्च खूप मोठा असतो. या आजारांसाठी कोणतीच योजना नाही. त्यामुळे योजनेमध्ये या आजारांनाही सामावून घेणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :Healthcare Budget 2018आरोग्य बजेट २०१८Budgetअर्थसंकल्पHealthआरोग्य