भाताच्या लावण्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
भोर तालुक्यात पावसाने पाठ फिरवली आहे. सध्या ढग येत आहेत, पण पाऊस मात्र जोर धरत नाही.
मागील दोन दिवसांपासून आभाळ व बारीक पाऊस थोडासा येतो व लगेच बंद होत आहे. त्यामुळे हव्या तशा भातपिकाच्या लावण्या रखडलेल्या आहेत.
पाऊस चांगल्या प्रकारे झाला तर माळरानावतील भातशेतात लावण्या करता येतील. ओढ्याकाठावरील पाणी घेता येईल तेवढ्याच लावण्या सुरू आहेत. पाण्याअभावी व पावसामुळे भाताच्या लावण्या पूर्णपणे रखडलेल्या आहेत. महुडे व वेळवंड या परिसरातील तांदळाला बाजारात चांगली मागणी असते. वेगवेगळ्या प्रकारचे भाताचे (तांदळाचे) वाण या परिसरात पाहावयास मिळते.
भाताची रोपे ही एक महिन्याची पुढची होऊ लागली आहेत. त्यामुळे लावणी करणे गरजेची असते. जास्त दिवसांची भाताची रोपे झाल्यावर त्याच्या मुळ्या तुटल्या जातात. ती भाताची रोपे जीव धरण्यास वेळ लागतो.
जोराचा पाऊस झाला तर लावण्या उरकतील. त्यामुळे या परिसरातील शेतकरी हा जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.