शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

‘नोटाबंदी’नंतरही बनावट नोटांचा बाजार गरम; ११७ गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 05:33 IST

नोटाबंदीनंतरही कोट्यवधी रुपये मूल्याच्या बनावट नोटांचा बाजारातील ओघ थांबलेला नाही.

पुणे : नोटाबंदीनंतरही कोट्यवधी रुपये मूल्याच्या बनावट नोटांचा बाजारातील ओघ थांबलेला नाही. गेल्या वर्षी १ कोटी ११ लाख ५२ हजार ५७० रुपये मूल्याच्या तर २०१७ मध्ये १ कोटी १६ लाख ९७ हजार ५० रुपये मूल्याच्या बनावट नोटा तपास यंत्रणांनी हस्तगत केल्या.विशेष म्हणजे चलनातून बाद झालेल्या एक हजार रुपयांच्या ३ हजार ९१ नोटा २०१८ मध्ये पकडल्या. नव्याने सुरु झालेल्या दोन हजार रुपयांच्या ४ हजार ६१५ नोटा २०१७ मध्ये ताब्यात घेतल्या आहेत.देशभरात ८ नोव्हेंबर २०१६ नोटाबंदी लागू झाल्यानंतर थोड्याच कालावधीत वेगवेगळ्या राज्यांमध्ये बनावट नोटा हस्तगत करण्याचे सत्र सुरू झाले. गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पुणे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये पाचशे रुपयांच्या ४ हजार ६९१ बनावट नोटा पकडल्या असून त्यात सर्वाधिक बनावट नोटा नागपुरात सापडल्या आहेत. त्याची आकडेवारी २ हजार ६६१ आहे. पाठोपाठ औरंगाबाद (१0७१), नाशिक (५५३) ही शहरे आहेत. नव्याने आलेल्या दोनशे रुपयांच्या २ हजार ९ बनावट नोटा यवतमाळ मधून हस्तगत झाल्या. गेल्या चार वर्षात पुण्यात बनावट नोटाबंदीच्या गुन्ह्यात २० गुन्हे दाखल केल. त्यात १८ जणांना अटक झाली आहे. यापैकी ११ गुन्हे उघड झाले.>बनावट नोटा आपल्यापर्यंत इतक्या सहज पोहचत नाहीत. विशिष्ट प्रकारच्या व्यक्तींच्या साखळीद्वारे त्या नोटा येतात. पूर्वी पाकिस्तानामधून बनावट नोटा येत. आता त्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. याचे कारण म्हणजे भारताने नोटांचा कागद आणि शाई यात केलेला फरक. नोटाबंदीनंतर बँकेतून टेÑझरीमध्ये पाठवणाऱ्या खोट्या नोट्या बाजुला काढल्या जाऊ लागल्या. टेÑझरीतून रिझर्व बँकेकडे नोटा जाताना त्या पुन्हा एकदा तपासल्या जातात. त्यावेळी देखील बनावट नोटा सापडल्यास चौकशी होते. परराज्यातून विशेषत: सीमेवरील राज्यातून बनावट नोटा येण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. प्रशासन दोषींवर कारवाई करते. मात्र दरवेळी प्रशासनावर अवलंबून राहण्यापेक्षा बनावट नोटाबंदीच्या बाबत लोकसहभाग जास्त महत्वाचा वाटतो. - जयंत उमराणीकर, माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक